Current Affairs 30 January 2020
अक्षयकुमार, डिक्रुज ब्रँड अॅम्बेसेडर
भारतीय एफएमसीजी ग्रुप केव्हिनकेअरच्या इनाेव्हेटिव्ह हेअर कलर ब्रँड इंडिकाने अभिनेता अक्षयकुमार व अभिनेत्री इलियाना डिक्रुज यांना आपल्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली आहे. २००८ मध्ये इंडिकाने १० मिनिटांत केसाला रंग देण्याचा शानदार फाॅर्म्युला आणून क्रांती केली हाेती. इंडिकाने १० मिनिटांच्या अभिनव प्लॅटफाॅर्मसाेबत स्वत: दक्षिण भारतात बाजार अग्रणीच्या दृष्टीने स्थापित केले, भारतात हेअर कलर श्रेणीत एक दिग्गज खेळाडू ठरला अाहे. याच्या प्राॅडक्ट पाेर्टफाेलिअाेमध्ये माेठी रेंज आहे.
जगातील सर्वाधिक ट्रॅफिक शहरात बेंगळुरू ‘टॉप’
जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असलेल्या टॉप १० शहरात भारतातील ४ शहरांचा समावेश आहे. रस्त्यावर सर्वात जास्त वाहनांची गर्दी असलेल्या शहरात भारताची राजधानी दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. जगात सर्वात जास्त ट्रॅफिक असणारे शहर म्हणून बेंगळुरू हे शहर ‘अव्वल’ ठरले आहे. बेंगळुरूमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिक आहे, अशी माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे.
शहर मोबिलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने आणि लोकेशन टेक्नॉलॉजी एक्सपर्ट टॉमटॉम च्या एका सर्व्हेत ही माहिती देण्यात आली आहे. या सर्व्हेत भारतातील टॉप शहरांचा समावेश करण्यात आला असून यात म्हटले की, दिल्लीकरांना पिक अवर्स दरम्यान गाडी चालवताना अन्य शहरांच्या तुलनेत वर्षाला १९० तासांहून अधिक वेळ खर्च करावा लागतो. तो एकूण ७ दिवस आणि २२ तास इतका आहे. गेल्यावर्षी दिल्लीत सर्वात जास्त ट्रॅफिक २३ ऑक्टोबर रोजी होते. जे ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. त्या दिवशी रेल्वेत नोकरी मिळावी यासाठी देशभरातून शेकडो दिव्यांग विद्यार्थी मंडी हाऊससमोर आंदोलनाला बसले होते. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
२४व्या आठवड्यात गर्भपात करता येणार; केंद्राची मंजुरी
केंद्र सरकारने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (दुरुस्ती) बिल २०२०ला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे आता महिलांना २४व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (दुरुस्ती) बिल २०२०ला मंजुरी दिल्याने मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी अॅक्ट १९७१च्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गर्भपाताचा अवधी वाढवण्यासाठी गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला उत्तर देताना महिलांच्या आरोग्याच्या कारणास्तव गर्भपात करण्याचा कालावधी २० आठवड्यावरून २४ ते २६ आठवडे करण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोर्टाला सांगितलं होतं. त्याबाबतचं प्रतिज्ञापत्रही कोर्टात दाखल करण्यात आलं होतं.
प्रसिद्ध संगीतकार फिनिअस ओ कॅनेल याला पाच ग्रॅमी पुरस्कार
‘ग्रॅमी’ हा संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो. वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची निर्मिती करणाऱ्या संगीतकार आणि गायकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा हा ६२वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा होता. हा पुरस्कार गाजवला तो प्रसिद्ध संगीतकार फिनिअस ओ कॅनेल याने.
ब्रेक माय हार्ट अगेन या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या फिनिअसने यंदाच्या वर्षात एक दोन नव्हे तर तब्बल पाच ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
पहिला पुरस्कार – ‘व्हेन वी ऑल फॉल अस्लीप’ या अल्बमसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बमचा पुरस्कार देण्यात आला.
दुसरा पुरस्कार – बॅड गाय या गाण्यासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंगचा पुरस्कार देण्यात आला.
तीसरा पुरस्कार – बॅड गाय या गाण्यासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार देण्यात आला.
चौथा पुरस्कार – ‘व्हेन वी ऑल फॉल अस्लीप’ या अल्बमसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम निर्मात्याचा पुरस्कार देण्यात आला.
पाचवा पुरस्कार – ‘व्हेन वी ऑल फॉल अस्लीप’ या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट अभियंत्याचा पुरस्कार देण्यात आला.