Uncategorized
चालू घडामोडी : ३० जुलै २०२०
Current Affairs 30 July 2020
प्रदूषण! भारतातली १४० कोटी जनतेचं आयुष्य ५.२ वर्षांनी घटलं
- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे भारतातील लोकांचं आयुष्यमान घटतंय. एका नव्या संशोधनातून समोर आलंय. भारतातील लोकांचं आयुर्मान (Life Expectancy) ५.२ वर्षांनी घटतेय आणि त्याचं कारण म्हणजे प्रदूषण, असं या अभ्यासात म्हटलं गेलंय.
- अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीच्या ‘द एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्युट’नं हा खुलासा केलाय. यामध्ये, भारतातील वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम भारतीयांच्या आयुष्यावर होत असल्याचं नमूद करण्यात आलंय.
- बांग्लादेशानंतर भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जिथे प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं आयुष्य कमी होत चाललंय.
- ‘जागतिक आरोग्य संघटने’नं (World Health Organisation) प्रदूषणासंबंधी जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, भारताच्या संपूर्ण लोकसंख्या अर्थात १४० कोटी भारतीय नागरिक प्रदूषणात आपलं आयुष्य जगत आहेत तर ८४ टक्के लोक भारतानं बनवलेल्या प्रदूषणाच्या गाईडलाईन्सनुसार, प्रदूषणात आपलं जीवन जगत आहेत.
- देशात राजधानी दिल्लीनंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरलंय. लखनऊमधल्या नागरिकांचं आयुर्मान १०.३ वर्षांनी घटलंय. तर दिल्ली वासियांचं आयुर्मान ९.४ वर्षांनी घटलंय.
देशाच्या शैक्षणिक धोरणात ३० वर्षांनी बदल
- केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. १९८६ मध्ये तयार केलेल्या शैक्षणिक धोरणाची जागा आता ‘शैक्षणिक धोरण २०१९’ घेणार आहे.
- याअंतर्गत देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार या कायद्याला अधिक व्यापक रूप देण्यात येणार आहे.
- आता ३ वर्षांपासून १८ वर्षांपर्यंतल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे.
- नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि आवश्यक क्षमतांना विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. तसंच यात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक दर्जाचे संशोधन आणि उच्च दर्जाचे शिक्षण यावर जोर देण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणाच्या जागतिक स्तरावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०१९ हे भारतीय नागरिक, परंपरा, संस्कृती आणि भाषांची विवधता लक्षात घेऊन वेगाने बदलणार्या समाजाच्या गरजांवर आधारित आहे. याव्यतिरिक्त नव्या बदलांद्वारे उच्च गुणवत्तेचं शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं पुन्हा ‘शिक्षण मंत्रालय’ असं नामकरण
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.
- हे नाव बदलून त्याचे शिक्षण मंत्रालय असे नामकरण करण्यात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
भारतीय भूमीवर झाले राफेलचे ‘हॅप्पी लँडिग
- फ्रान्सकडून झेपावलेली राफेल घातक लढाऊ विमाने भारतीय भूमीवर उतरली आहेत.
- फ्रान्सच्या बोरदू शहरातील मेरिगनेक हवाई तळावरून ७००० किलोमीटरचे अंतर पार करून ही विमाने भारतीय हवाई हद्दीत आली तेव्हा दोन सुखोई ३० एमकेआय विमानांनी त्यांचे स्वागत केले व अंबालापर्यंत आणले.
- जगभरातील सर्वोत्तम लढाऊ विमानांमध्ये समावेश असलेल्या राफेलचा ५९,००० कोटी रुपयांचा सौदा एनडीए सरकारने २३ सप्टेंबर २०१६ रोजी केला होता. एकूण ३६ विमाने भारत खरेदी करणार आहे. आज आलेल्या ५ विमानंपैकी तीन विमाने एक आसनी तर दोन विमाने दोन आसनी आहेत. त्यांना अंबालास्थित स्क्वाड्रन१७मध्ये समाविष्ट केले जाईल. भारताला आतापर्यंत एकूण १० विमाने पुरवण्यात आली असून, त्यापैकी पाच विमाने प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच ठेवलेली आहेत. खरेदी केलेली राफेलची सर्व ३६ विमाने २०२१पर्यंत भारतात येणार आहेत.
Nice