⁠
Uncategorized

चालू घडामोडी : ३० जून २०२०

Current Affairs 30 June 2020

‘टिकटॉक’सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी

Untitled 34 3
  • केंद्र सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली.केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली.
  • माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.
  • बंदी घालण्यात आलेल्या अँपमध्ये टिकटॉक, शेअर इट, क्वाई, युसी ब्राऊझर, बैदु मॅप, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हेलो, लाईक, युकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राऊझर, व्हायरस क्लिनर, एपीयुएस ब्राऊझर, आरओएमडब्लूई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, बॅटरी प्लस, वुई चॅट, युसी न्यूज, क्यू क्यू मेल, वुईआयबीओ, झेंडर, क्युक्यु म्युझिक, क्युक्यु न्यूजफीड, बिगो लाईव्ह, सेल्फी सिटी, मेल मास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडीओ कॉल- शावमी, वुइसीन्स, ईएस फाईल एक्सप्लोरर, व्हिवा व्हिडीओ-क्यू यु व्हिडीओ आयएनसी, मेईटू, व्हिगो व्हिडीओ, न्यू व्हिडीओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट -हाईड, कॅचे क्लिनर डीयू ऍप स्टुडिओ, डीयू क्लिनर, डीयू ब्राऊझर, हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर – चिताह मोबाईल, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्युक्यु प्लेयर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बैदु ट्रान्सलेट, व्हीमेट, क्युक्यु इंटरनॅशनल, क्युक्यु सिक्युरिटी सेंटर, क्युक्यु लॉन्चर, यु व्हिडीओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ, मोबाईल लिजेंड्स, डीयू प्रायव्हसी इत्यादी ऍपचा समावेश आहे.

‘आयसीसी’ एलिट पंचांच्या यादीत भारताचे नितीन मेनन

Untitled 31 8
  • भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे.
  • मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत.
  • आगामी २०२०-२१ हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे. ३६ वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, २४ एकदिवसीय आणि १६ ट्वेन्टी-२० लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
  • नितीन मेनन यांच्याव्यतिरीक्त सध्या आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये अलिम दार, कुमार धर्मसेना, मारियस इरॅस्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉग, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबुरो, ब्रुस ऑक्सनफर्ड, पॉल रेफेल, रॉड टकर आणि जोएल विल्सन यांचा समावेश आहे.

जगातील सर्वात मोठा अणू फ्यूजन प्रकल्पाचा फ्रिज भारतात तयार

  • फ्रान्समध्ये दीड लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या अणू फ्यूजन प्रकल्पात भारत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
  • या प्रकल्पाचे ‘हृदय’ असलेला भाग म्हणजेच ‘क्रायोस्टेट’ (फ्रिज) सुरतच्या हजिरा येथून फ्रान्सला पाठवला जाईल. यास एलअँडटीने बनवले आहे.
  • जेव्हा अणुभट्टी जास्त उष्णता निर्माण करते तेव्हा त्याला थंड करण्यासाठी मोठ्या रेफ्रिजरेटरची आवश्यकता असते. याला क्रायोस्टेट म्हणतात. भारताने याचे काम चीनकडून काढून घेतले होते. या प्रकल्पातून १५० दशलक्ष डिग्री सेल्सियस तापमान तयार होईल. जे सूर्याच्या कोरपेक्षा दहापट जास्त असेल. क्रायाेस्टेट वजन ३८५० टन अन् उंची ३० मजले इमारतीएवढी अाहे. याच्या ५० व्या आणि अंतिम भागाचे वजन सुमारे ६५० टन आहे. फ्रान्समधील कादार्शे येथे अणुभट्टी बांधली जात आहे. त्यात हे क्रायाेस्टेट वापरले जाईल.
  • क्रायोस्टेट या यंत्राच्या वर बसवले जाईल.
  • क्रायोस्टेट
  • भारत-अमेरिका, जपानसह ७ देश मिळून बनवत आहेत हे यंत्र
  • पृथ्वीवर सूक्ष्म सूर्याची निर्मिती करण्याचे काम ७ देशांनी हाती घेतले आहे. यात भारत, अमेरिका, जपान व रशियाचा समावेश आहे. ‘क्रायोस्टेट’ बनवण्याची जबाबदारी भारतावर होती. याच्या खालच्या भागातील सिलिंडर मागील वर्षी जुलैमध्ये तर वरील सिलिंडर मार्चमध्ये पाठवले. आता त्याचे झाकण पाठवण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button