⁠  ⁠

चालू घडामोडी : ३० मार्च २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs 30 March 2020

कोरोना विषाणूसाठी अँटीबॉडी चाचणी सुरू करणारा भारत जगातील पहिला देश

कोरोना विषाणूसाठी अँटीबॉडी चाचणी सुरू करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. एखाद्या व्यक्तीला यापूर्वी विषाणूची लागण झाली होती की नाही याची पुष्टी करण्यासाठी भारत अँटीबॉडी चाचण्या करण्यास तयार आहे.

कोविड -१९ चा साथीचा रोग समजून घेण्यास याची मदत होईल. भारताने अवलंबलेली पद्धत जगात पहिली प्रथम आहे. रक्तातील प्रतिपिंडे शोधणारी ही एक सेरॉलॉजिकल चाचणी आहे. सक्रिय संक्रमण निश्चित करण्यासाठी नासिका किंवा इतर गोष्टींपेक्षा सद्य पद्धतींपेक्षा ही चाचणी भिन्न आहे. व्यक्तीच्या रक्तात अँटीबॉडीजच्या उपस्थितीच्या आधारे विषाणू संसर्ग होतो की नाही हे चाचणीद्वारे निर्धारित होते.

गुगलने सुरु केली एकाच वेळी १२ जणांशी गप्पा मारता येणारी सेवा

Google

गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओने एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युझर्सची संख्या वाढवली आहे. आता गुगल ड्युओवरुन १२ जण तर व्हॉट्सअॅपवरुन चार जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. ग्रुप कॉलिंगची मर्यादा आठवरुन बारापर्यंत वाढवली आहे.

काही अ‍ॅपच्या मदतीने तर एकाच वेळी १०० जणांना कॉल करता येतो. अ‍ॅपलच्या फेसटाइप अ‍ॅपवर एकाचवेळी ३२ तर स्काइप आणि फेसबुक मेसेंजरवर एकाच वेळी ५० जणांशी व्हिडिओ कॉलवर बोलता येते. तर झूम अ‍ॅपमध्ये एकाच वेळी १०० जण व्हिडिओ कॉल करु शकतात. मागील वर्षीच गुगलने ड्युओवरील चार जणांची मर्यादा वाढवून आठ केली होती. तसेच गुगलने आपल्या जी सूटमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा नुकतीच २५० पर्यंत वाढवली होती.

स्पेनच्या राजकन्येचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

princess maria teresa

स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. त्या ८६ वर्षांच्या होत्या. मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली. स्पेनचे राजे फिलिप (सहावे) यांना करोना झाल्याचा संशय होता. मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती.

मारिया ह्या राजकन्या तर होत्याच शिवाय त्या एक समाजशास्त्राच्या प्रोफेसरही होत्या. त्या धाडसी होत्या. त्यांची वक्तव्य थेट असायची. शिवाय त्या समाजकार्यात आघाडीवर असायच्या. त्यामुळे त्यांचं नाव रेड प्रिन्सेस असं प्रसिद्ध झालं होतं.

प्रसिद्ध इतिहासकार अर्जुन देव यांचे निधन

प्रसिद्ध इतिहासकार व एनसीईआरटीचे माजी अधिष्ठाता प्रा. अर्जुन देव (८०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांनी इतिहासकार रोमिला थापर, विपिन चंद्र व रामशरण शर्मांच्या पुस्तकांचे संपादन केले

फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड

फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड

फिफाच्या कोविड -१९ मोहिमेसाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याची निवड करण्यात आली आहे.
कोविड -१९ चा मुकाबला करण्यासाठी फिफा ही मोहीम राबवत आहे. फिफाने ही मोहीम राबविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेशी हातमिळवणी केली आहे. जगभरातील लोकांना हा रोग रोखण्यासाठी सहभागी करून घेण्यासाठी ही मोहीम आहे. ही मोहीम १३ वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडिओ स्वरूपात आयोजित करण्यात येईल.

Share This Article