‘माइंडशेअर इंडिया’ला एजन्सी ऑफ दी इयर पुरस्कार
यंदाचे फेस्टिव्हल ऑफ मीडिया ग्लोबल (एफओएमजी) पुरस्कार गुरुवार २७ मे रोजी जाहीर करण्यात आले असून ‘माइंडशेअर इंडिया’ने अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रॅण्ड प्रिक्स : एजन्सी ऑफ दी इयर’ या पुरस्कारासह अनेक पदकेही पटकावली आहेत.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह ‘माईंडशेअर इंडिया’ने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकेही पटकावली आहेत.
स्थानिक ब्रॅण्डचा सर्वोत्तम प्रचार केल्याबद्दल ‘व्हील करिअर फ्रॉम होम’ने एक सुवर्ण, तर परिणाम आणि डिजिटलचा सर्वोत्तम वापर केल्याबद्दल दोन रौप्य पदके पटकावली आहेत. माहिती आणि ज्ञानाचा उत्तम वापर केल्याबद्दल ‘बूस्ट स्टॅमिना मीटर’ला सुवर्ण, तर पणनक्षेत्रातील रौप्य पदक पटकावले आहे.
एफओएमजी पुरस्कार केवळ जगभरातील माध्यम प्रचारासाठी दिले जातात.
मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा भीमपराक्रम
महाराष्ट्राचा पॅरा जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने टोकियो पॅरालिम्पिक पात्रता फेरीत प्रवेश करत मोठा विक्रम रचला आहे.
यासह तो पॅरालिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला.
आतापर्यंत देशातील कोणत्याही जलतरणपटूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळविली नव्हती.
सुयश आता टोकियो येथील स्पर्धेत ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक मेडलीच्या एसएम-७ वर्गात सहभाग घेणार आहे.
२०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पात्रता फेरीत धडक दिली.
५० मीटर बटरफ्लाय फेरीचा टप्पा पार करण्यासाठी त्याला ०.३२.९० सेकंदाचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी त्याने अवघ्या ०.३२.७१ सेकंदात ही फेरी पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले होते. तर, २०० मीटर मेडली फेरी पूर्ण करण्यासाठी २.५७.०९ सेकंदाचा अवधी होता आणि त्याने २.५६.५१ सेकंदात ही फेरी पार करत कांस्य पदक जिंकले होते. तो सध्या बालेवाडीच्या साई केंद्रात सराव करत आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट २०२१ ते ५ सप्टेंबर २०२१या काळात टोकियोमध्ये होणार आहेत.
जगभरात धूम्रपान करणारा चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर
जगभरात धूम्रपान करणाऱ्यांची संख्या ११० काेटींवर गेली आहे. ही संख्या गेल्या ३० वर्षांत वेगाने वाढतेय. १९९० नंतर जगभरात १५ काेटी एवढी धूम्रपान करणाऱ्यांची भर पडली. प्रत्येकी पाच पुरुषांपैकी एकाचा धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे हाेत आहे. एका नव्या अभ्यासात ही बाब समाेर आली आहे.
संशाेधकांनी २०४ देशांतील आकड्यांचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. जागतिक आराेग्य संघटनेच्या दृष्टीने हा आकडा १३० काेटींहून जास्त आहे.
२०१९ मध्ये सुमारे ८० लाख लाेकांचा धूम्रपानामुळे मृत्यू झाला.
धूम्रपानातून हृदयराेगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० लाख ७० हजारांवर आहे.
सिगारेट पिणाऱ्या लाेकसंख्येपैकी दाेन तृतीयांश १० देशांत आहेत. त्यात चीन, भारत, इंडाेनेशिया, अमेरिका, रशिया, बांगलादेश, जपान, तुर्की, व्हिएतनाम, फिलिपाइन्सच्या नावाचा समावेश आहे.
टॉप 5 देश, चीनमध्येही धूम्रपान करणाऱ्या महिलांची संख्या जास्त
चीन 31.81 कोटी
भारत 11.58 कोटी
इंडोनेशिया 5.8 कोटी
रशिया 2.59 कोटी
बांगलादेश 2.5 कोटी