चालू घडामोडी : ३१ ऑगस्ट २०२०
Current Affairs : 31 August 2020
फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला संयुक्त जेतेपद
फिडे जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने या ऑनलाइन स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.
सुरुवातीला रशियाला विजेता घोषित करण्यात आलं कारण फायनलमध्ये भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत कनेक्शन होत नसल्याने वेळ गमावला.
भारताने या वादग्रस्त निर्णयाला विरोध दर्शवला त्यानंतर याची समिक्षा करण्यात आली आणि भारत-रशिया या दोन्ही देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघानं (फिडे) पहिल्यांदाच कोविड-१९ आजारामुळं अशा प्रकारे ऑनलाइन ऑलिंपियाडचं आयोजन केलं होतं. दरम्यान, संस्थेने ट्विट करीत अंतिम निर्णय घोषित केला. फिडे अध्यक्ष अर्काडी डोवोरकोविच यांनी दोन्ही संघ भारत आणि रशियाला फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचा विजेता घोषीत करीत दोघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला
भारताने निर्यात केला विक्रमी ११.८३ लाख टन मसाला
यंदा 225 प्रकारच्या मसाला उत्पादनांची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी २१९ उत्पादनांची निर्यात झाली होती. यात मिरची, जिरे, मिंट आणि हळद प्रमुख आहेत. त्यांचा एकूण निर्यातीत सुमारे 80% वाटा आहे.
सर्वाधिक 4,84,000 टन मिरचीची निर्यात झाली आहे. मिरचीची निर्यात 15% वाढली आहे. जिरे दुसरे सर्वाधिक निर्यातीत मसाला आहे. गेल्या वर्षापेक्षा १६% जास्त.
आल्याची सर्वाधिक मागणी वाढली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 178% जास्त निर्यात झाली. 449 कोटी रुपये आले.
भारताने आर्थिक वर्ष २०१९- २० मध्ये खाद्य मसाल्यांची निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त निर्यात करण्यात यश मिळवले आहे. ११,८३,००० टन मसाल्यांची निर्यात केली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत १०% जास्त आहे. यातून २२५ कोटी रुपये मिळाले. लक्ष्य १०,७५,००० टनचे होते.
नाशिकला तयार होणार देशातील पहिला ई-पासपोर्ट
परदेशात जाण्यासाठी अत्यावश्यक दस्तएेवज असलेले पासपोर्ट नाशिकराेडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार केले जातात.
अाता देशातील पहिला ई-पासपाेर्टही याच प्रेसमध्ये तयार हाेणार अाहे.
प्रगत देशांप्रमाणेच भारतामध्येही प्रवाशांना ई-पासपाेर्ट देण्याचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. त्याच्या छपाईसाठी इन-ले तयार करण्याची याेजना ही दहा वर्षांपासून रखडलेली होती. अाता त्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली अाहे.
त्यानुसार सिक्युरिटी प्रेसमध्ये पन्नास टक्के परदेशी कंपनी आणि पन्नास टक्के भारतीय कंपनीच्या माध्यमातून हा इन-ले तयार केला जाणार अाहे. त्यातून तयार हाेणारे ई-पासपाेर्ट पुढील वर्षी भारतीय नागरिकांच्या हाती पडतील, असे नियाेजन अाहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पन्नास ते ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क असलेले मुद्रांक तयार केले जातात.
तसेच विविध देशांच्या मागणीनुसार लेबल तयार करून दिली जातात. सध्या कोरोनातही कामगारांनी नोटा व मुद्रांकांचा तुटवडा भासू नये, यासाठी सलग काम केले. पारंपरिक पासपोर्टही तयार करण्यात येत अाहेत. प्रगतशील देशांप्रमाणेच भारतातही इ-पासपोर्ट तयार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. परंतु क्लिष्ट नियमांमुळे १० वर्षापासून मुहूर्त लागत नव्हता. अाता मोदी सरकारने त्यासाठी इन-ले तयार करण्याच्या टेंडरला मंजुरी दिली अाहे. हा ७० टक्के इन-ले नोएडात तर ३० टक्के बंगळुरूमध्ये तयार हाेईल. नंतर ताे नाशिक येथील प्रेसमध्ये लावल्यावर छपाई सुरू होईल.