Current Affairs 31 January 2020
डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र बॅंक नंबर 1
-डिजिटल व्यवहारांमध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र डिसेंबर महिन्यात देशांमध्ये सर्व बॅंकात पहिल्या क्रमांकावर आली आहे. यामध्ये सरकारी बॅंकांबरोबरच खासगी आणि सहकारी बॅंकांचाही विचार केलेला आहे. ही आकडेवारी माहिती तंत्रज्ञान मंत्रालय संकलित करते.
– माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिल्या पन्नास बॅंकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर बॅंक ऑफ महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर येस बॅंक, तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बॅंक, चौथ्या क्रमांकावर फिनो बॅंक आणि पाचव्या क्रमांकावर आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश करण्यात आला आहे.
– एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये केवळ 13 बॅंकांची कामगिरी समाधानकारक आहे. 28 बॅंकांची कामगिरी सर्वसाधारण आहे. तर 9 बॅंकांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटवर येणार – गुजरात मुख्यमंत्री
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देतील
- संपूर्ण आशियामध्ये साबरमती नदी सर्वात स्वच्छ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हे शक्य झाले. जपान आणि इस्रायलचे पंतप्रधान सुद्धा साबरमती रिव्हरफ्रंटवर आले होते. त्यांना सुद्धा नदीची स्वच्छता पाहून आश्चर्य वाटले” असे रुपानी म्हणाले. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात येतील. तेव्हा, ते सुद्धा रिव्हरफ्रंटला भेट देतील”.
फुटबॉलपटू बाला देवी युरोपमधील क्लबशी करारबद्ध
- गंगोम बाला देवी स्कॉटलंडमधील रेंजर्स एफसी या क्लबशी करारबद्ध झाली आहे.
- मणिपूरची आघाडीवीर बाला देवी ही परदेशी क्लबशी करारबद्ध झालेली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे.
- रेंजर्स महिला संघाने २९ वर्षीय बाला देवी हिच्याशी १८ महिन्यांचा करार केला आहे.
- बाला देवीने भारतातर्फे सर्वाधिक गोल करण्याची किमया साधली आहे.
- तिच्या नावावर ५८ सामन्यांत ५२ गोल जमा आहेत. दक्षिण आशिया विभागातील ती सर्वाधिक गोल करणारी एकमेव खेळाडू आहे. वयाच्या १५व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या बाला देवीने भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही सांभाळले आहे.
- तिने २०१५ आणि २०१६मध्ये अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
- संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होत असून हे अधिवेशन दोन टप्प्यात होत आहे.
- पहिला टप्पा ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल. एक महिन्यानंतर अधिवेशनाचा दुसरा टप्प २ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत चालेल.
- नागरिकत्व कायदा, बेरोजगारी, जामिया मिलिया हिंसाचार अशा मुद्द्यांवर अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
राणी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार
- भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.
- चाहत्यांकडून गेली २० दिवस मते मागवण्यात आल्यानंतर वर्ल्ड गेम्सने गुरुवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
- राणीला वर्ल्ड गेम्सचा सर्वोत्तम अॅथलीटचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. राणीने तब्बल १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले. जगभरातील ७ लाख, ५ हजार, ६१० चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना मते दिली होती,’’ असे ‘वर्ल्ड गेम्स’च्या पत्रकात म्हटले आहे.
थायलंडमध्ये भारताच्या गीता यूएनच्या मुख्य दूत
-भारताच्या गीता सभरवाल थायलंडमध्ये यूएन मोिहमेच्या मुख्य दूत असतील. त्यांना थायलंडमध्ये यूएनच्या रेसिडंट को ऑर्डिनेटर नियुक्त करण्यात आले आहे. मालदीव, श्रीलंकेसह पाच आशियायी देशांत त्यांनी काम पाहिले आहे.