मोदी सरकारमध्ये ५७ मंत्र्यांचा समावेश
- राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये २४ केंद्रीय मंत्री, ९ स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींसह सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद, हरसिमरत कौर बादल, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, अरविंद सावंत यांच्यासह २४ केंद्रीय मंत्र्यांनी शपथ घेतली.
भारतीय लेखिकेला मानाचा नाईन डॉटस पुरस्कार
- भारतीय लेखिक ऍनी झैदी यांना 2019 सालासाठीचा तब्बल 1 लाख डॉलरचा “नाईन डॉट्स’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातील सद्यस्थितीच्या विषयांवरच्या नाविन्यपूर्ण विचार मांडणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो.
- मूळच्या मुंबईतील रहिवासी असलेल्या झैदी या मुक्तलेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत अहवाल, निबंध, लघुकथा, कविता आणि नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या “ब्रेड, सिमेंट, कॅक्टस’ या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे.
- या पुस्तकातून झैदी यांनी घर आणि भारतातील समकालीन जीवनाबद्दलच्या बांधिलकीच्या अनुभवांचे वास्तव मांडले आहे.
- त्यांच्या पुस्तकामध्ये “होम’ या 3 हजार शब्दांच्य निबंधामध्ये “घरासारखे काही ठिकाण नाही का ?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आल आहे.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार
- 17 व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून संतोष गंगराम यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल आठ वेळा लोकसभेचे सदस्य राहिलेले गंगराम हे ज्येष्ठ सदस्य असल्याने त्यांच्याकडे हंगामी सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
- संतोष गंगवार हे उत्तर प्रदेशमधील बरेली येथून निवडून येतात. हंगामी अध्यक्षपदासाठी मनेका गांधी आणि संतोष गंगराम या दोघांची नावे आघाडीवर होती. दोन्ही नेते आठ वेळा खासदार राहिले असून सध्या संसदेतील सर्वात ज्येष्ठ सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
‘मेक इन इंडिया’, भारतीय बनावटीचा पहिला पोर्टेबल कीबोर्ड बाजारात
- यामाहा म्युझिक इंडियाने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत पहिला भारतीय कीबोर्ड PSR I500 सादर केला आहे. संगीत शिकू इच्छिणाऱ्या आणि परफॉर्म करणाऱ्या जागतिक संगीतप्रेमींसाठी पोर्टेबल कीबोर्डचा नवा प्रकार आहे. या वाद्यामध्ये व्यापक प्रमाणावरील भारतीय वाद्यांचे सूर आणि ऑटो अकंपनीमेंट स्टाइल सुविधा असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीय संगीत प्रकारांचा प्रचंड मोठा आवाका मिळतो.
- PSR I500 मध्ये 801 वाद्यांचे सूरांसह 40 भारतीय वाद्ये आहेत. या कीबोर्डमध्ये पिआनोपासून सिंथेसायझरपर्यंत विविध प्रकारच्या वाद्यांचे सूर असल्याने यात विविध प्रकारची गाणी वाजवणे शक्य होते
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारताला मिश्र सांघिकमध्ये दोन सुवर्णपदके
- जर्मनी येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गुरुवारी भारताने दमदार कामगिरी करताना मिश्र सांघिक प्रकारात दुहेरी विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेत भारताने पाचव्या सुवर्णपदकाची कमाई केली.
- भारतासाठी अपूर्वी (१० मीटर एअर रायफल), राही सरनोबत (२५ मी पिस्तुल), सौरभ चौधरी (१० मी एअर पिस्तुल) यांनी सुवर्णपदक मिळवले. १० मी. मिश्र एअर रायफलमध्ये अंतिम सामना अपूर्वी चंडेला आणि दीपक कुमार विरुद्ध अंजूम मुदगिल आणि दिव्यांश सिंग या भारताच्याच जोडय़ांमध्ये झाला. मात्र अंजूम व दिव्यांश यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले, तर अपूर्वी व दीपकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- भारताने पाच सुवर्ण, एका रौप्यपदकासह पदकतालिकेत अग्रस्थान मिळवले, तर चीनने दोन सुवर्णासहित नऊ पदक पटकावून दुसरा क्रमांक मिळवला.
इस्रायलमध्ये पुन्हा निवडणूक
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे बुधवारी रात्रीपर्यंतच्या निर्धारित मुदतीत विविध राजकीय पक्षांच्या आघाडीचे सरकार बनवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे इस्रायली लोकप्रतिनिधींनी अभूतपूर्व पाऊल उचलत देशाची संसद बरखास्त करण्याचा प्रस्ताव ७४ विरुद्ध ४५ अशा बहुमताने मंजूर केला. परिणामी, इस्रायलमध्ये १७ सप्टेंबरला पुन्हा निवडणुका होणार आहेत.