Current Affairs 31 May 2020
नासाच्या करोना व्हेंटिलेटर्सचा परवाना पुण्याच्या भारत फोर्जला
- नासाने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना पुणे,हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना देण्यात आला आहे.
- गंभीर स्वरूपातील करोना रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर्स वापरले जातात. भारतातील ज्या कंपन्यांना हा परवाना मिळाला त्यात पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.
- भारतीय कंपन्यांशिवाय इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे. दी नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे.
- अमेरिकेतील रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे. एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने ३० एप्रिल रोजी परवानगी दिली होती.
- व्हायटल म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचीक असून त्यात सुधारणाही करता येतात. जेपीएल कार्यालयातील लिऑन अल्कालाय यांनी सांगितले, की हे तंत्रज्ञान जगभरात उपलब्ध व्हावे अशीच आमची इच्छा आहे. हा व्हेन्टिलेटर डॉक्टरांशी चर्चा करून तयार केला आहे. २३ एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.
विराट फाेेर्ब्जच्या टाॅप-१०० मध्ये
- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली याने वर्षभरात १९६ काेटी रुपयांची कमाई करून या वर्षात सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या खेळाडूं्च्या फाेर्ब्ज मॅगझिनच्या यादीमध्ये अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान पटकावले अाहे.
- स्वित्झर्लंडचा टेनिसपटू राॅजर फेडरर ८०० काेटींची कमाई करून अव्वलस्थानी अाहे. फेडररने उत्पन्नामध्ये नामांकित फुटबाॅलपटूंना मागे टाकले अाहे. गेल्या वर्षी ताे पाचव्या स्थानावर हाेता.
- कोहली 100 खेळाडूंच्या यादीत 66 व्या स्थानावर आहे. मागच्यावर्षी तो 100 व्या तसेच 2018 ला 83 व्या स्थानावर होता.
- कोहलीने 2.4 कोटी डॉलर जाहिराती आणि ब्रॅन्ड या माध्यमातून तर 20 लाख डॉलरची कमाई वेतन आणि पुरस्कारातून केली आहे.
नासाचे स्पेस एक्स लाँच
- अमेरिकी अंतराळ संस्था नासाने 9 वर्षांनंतर इतिहास रचला आहे.
- तर फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने स्पेसएक्स डेमो-2 मिशन लाँच केले आहे. अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
- तसेच चंद्रावर उतरण्याचे पहिले उड्डाण याच केंद्रावरून करण्यात आले होते.
- नासाचे संचालक जीम ब्राईडेन्स्टीन यांनी सांगितले की, अमेरिकेने 9 वर्षांनी त्यांच्या जमिनीवरून अंतराळवीर पाठविले आहेत.
- नासाने यावेळी स्पेसएक्स फाल्कन 9 हे रॉकेट पाठविले आहे. यामध्ये रॉबर्ट बेंहकेन आणि डग्लस हुर्ले हे दोन अंतरालवीर आहेत.
- तर हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर यशस्वीरित्या गेले असून कॅप्सूल यशस्वीरित्या उघडल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले.
जीएसटी : ५,९३४ काेटी, ८७ % तूट
- एप्रिलमध्ये वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) रूपाने ५,९३४ काेटी रुपये मिळाले अाहेत. गेल्या वर्षात याच कालावधीतील ४६,८४८ काेटी रुपयांच्या तुलनेत त्यात ८७ % घट झाली अाहे. ही आकडेवारी मार्चमधील आर्थिक व्यवहाराशी संबंधित अाहे.लॉकडाऊनमुळे ही घट आली आहे.