⁠
Uncategorized

चालू घडामोडी – ६ ऑगस्ट २०१६

देश-विदेश

शुभा मुदगल यांची राजीव गांधी सद्भावना पुरस्कारासाठी निवड
# हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक ऐक्य, शांतता व सदिच्छा यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मिळणार असलेल्या या पुरस्काराचे स्वरूप रोख १० लाख रुपये व मानपत्र असे आहे. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार सल्लागार समितीच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत मुदगल यांना या पुरस्कारने सन्मानित करण्याचा निर्णय गेण्यात आला आहे.

क्रीडा

पहिले सुवर्णपदक अमेरिकेच्या व्हर्जिनियाला
# रिओ दी जानिरो – अमेरिकेची नेमबाज व्हर्जिनिया थ्रॅशर हिने रिओ ऑलिंपिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला. महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये तिने अंतिम फेरीत 208 गुणांसह बाजी मारली. पहिल्या शॉटमध्ये तिने 10.5, तर दुसऱ्या शॉटमध्ये 10.4 गुण मिळविले. त्यामुळे तिला चीनच्या ली ड्यू हिच्यावर सहज आघाडी मिळाली. दोन वेळच्या सुवर्णविजेत्या ली हिला केवळ एका गुणाने मागे टाकत व्हर्जिनियाने बाजी मारली. चीनच्या सिलिंग यू हिने ब्रॉंझ मिळविले.

अर्थव्यवस्था

केंद्र सरकारचे 4 टक्के चलनवाढीचे उद्दिष्ट
# नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुढील पाच वर्षांसाठी चार टक्के चलनवाढीचे उद्दिष्ट निश्‍चित केले असून, या आधारावर नवी व्याजदर निश्‍चिती समिती आगामी पतधोरण ठरविणार आहे. पतधोरण ठरविण्याबाबत सरकारने हे नव्या दिशेने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने ठरविलेले चलनवाढीचे उद्दिष्ट दोन टक्‍क्‍यांनी अधिक अथवा कमीच्या आसपास मानले जाते. त्यामुळे चलनवाढीची कमाल मर्यादा 2021 पर्यंत सहा टक्के गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांच्या चलनवाढ आधारित पतधोरणाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीच्या स्थितीमुळे निर्माण होणारी आव्हाने आणि विकासाचा वेग या बाबींचा विचार करून चलनवाढीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. ही मोठी पतधोरण सुधारणा आहे. हे पतधोरण निश्‍चित करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेसोबत गेल्या वर्षी करार झाला आहे. सरकारने पुढील पाच वर्षांसाठी चार टक्के चलनवाढीचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याची कमाल मर्यादा सहा टक्के आणि किमान मर्यादा दोन टक्के आहे.

Related Articles

Check Also
Close
Back to top button