Current Affairs – 6 November 2016
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील महत्त्वाच्या गोष्टी
# अमेरिकन अध्यक्षपदासाठी ८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ९ सप्टेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होईल.
# डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.
# ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत १२ कोटी अमेरिकन नागरिक मतदान करतील.
# अमेरिकेत प्रत्येक राज्याला अशी निर्धारित मतं निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याला म्हणतात इलेक्टोरल कॉलेज.
# मेरिकेत ५० राज्यं आहेत. या ५० राज्यांना निर्धारित करण्यात आलेल्या मतांची बेरीज ही अमेरिकेची केंद्रीय प्रतिनिधी सभा.. म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सेनेट यांच्या एकूण सदस्यसंख्येइतकी आहे.
# अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेची सदस्यसंख्या आहे ४३५ आणि सेनेटचे १०० अशी ५३५ अधिक दोन मतं राजधानी वॉशिंग्टन डीसीसाठी आणि एक मत अमेरिकेतील सर्वात कमी लोकसंख्येचा वायोमिंगसाठी. म्हणजे झाले ५३८.
# अध्यक्षीय उमेदवाराला विजयासाठी किमान २७० मतांची आवश्यकता असते. लोकांनी केलेल्या मतदानाबरोबरच उमेदवाराला विजयी होण्यासाठी २७० इलेक्टोरल कॉलेज मतेही महत्त्वाची असतात.
भारत जपानकडून १० हजार कोटींना १२ विमाने खरेदी करणार
# पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्याच्या एक आठवडाआधी भारताने जपानकडून १२ विमानांची खरेदी केली आहे. १० हजार कोटी रुपयांना ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत.
# अनेक वर्षांपासून हा खरेदीचा प्रस्ताव बारगळला होता.
# पंतप्रधान नरेंद्र मोदी ११-१२ नोव्हेंबरला टोकियोच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोघांकडून बिगरसैनिकी अणू सहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
# भारत जपानकडून १२ यूएस-२ आय विमानांची खरेदी करणार आहे. यातील ६ विमाने नौदल, तर ६ विमाने तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.
# यूएस-२ आय विमाने कमीतकमी वेळात जमीन आणि पाण्यावरुन उड्डाण करु शकते. चार मोठ्या टर्बोप्रॉपवर चालणाऱ्या या विमानाचा पल्ला ४,५०० किलोमीटरहून अधिक आहे. तीन मीटर उंच लाटांमध्येही यूएस-२ आय विमान समुद्रात उतरु शकते. हवाई-सागरी शोध मोहीम आणि मदतकार्यासाठी या विमानाची रचना करण्यात आली आहे.
# यूएस-२ आय विमाने अतिशय वेगाने उड्डाण करतात. ३० सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता यूएस-२ आय विमानांमध्ये आहे.
# या विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि जपानमध्ये २०१३ पासून बोलणी सुरू होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी त्यांच्या जपान दौऱ्यात या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती.
जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर महिला जवान तैनात
# जम्मू काश्मीरमधील १९२ किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या ९० महिला जवानांना तैनात करण्यात आले आहे.
# हातामध्ये ५.६ एमएम रायफल घेऊन या महिला सीमेवर गस्त घालत आहेत.
# सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवान आरएस पुरा सेक्टरसोबतच अखनूर, अरनियासारख्या संवेदनशील ठिकाणांवरही तैनात आहेत.
अनिवासी भारतीयांच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाचे खास प्रयत्न
# अनिवासी भारतीयांना मतदानासाठी निवडणूक आयोगाने खास मोहीम सुरू केली आहे.
# एक कोटी १४ लाख अनिवासी भारतीयांपैकी केवळ १६ जणांनीच मतदार यादीत नोंद केली आहे. त्यामुळे आता आयोगाने त्यांच्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण सुरू करणार आहे. तसेच मतदान करण्यासाठी सोयीची पद्धत कोणती याबाबतचे मत विचारले आहे.
# १९५० च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात फेब्रुवारी २०११ मध्ये सुधारणा करण्यात येऊन अनिवासी भारतीयांच्या त्यांच्या मूळ गावी म्हणजे पारपत्रावर उल्लेख असलेल्या ठिकाणी मतदान नोंदणीचा अधिकार मिळाला.
# सध्या लष्करातील व्यक्तींना असलेला प्रतिनिधीद्वारे मतदान (प्रॉक्सी व्होटिंग) अधिकार अनिवासी भारतीयांना तसा अधिकारदेता येईल काय, हा एक पर्याय आयोगापुढे आहे.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]