⁠  ⁠

Current Affairs – 6 September 2018

Rajat Bhole
By Rajat Bhole 4 Min Read
4 Min Read

आधार नसल्यास विद्यार्थ्यांना शाळा प्रवेश आणि सुविधा रोखता येणार नाहीत : यूआयडी

  • विद्यार्थ्यांना आधारनोंदणी आणि अपडेटची सुविधा उपलब्ध करुन देणे ही शाळांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर कोणत्याही विद्यार्थ्याला आधार नसल्यामुळे शाळा प्रवेश तसेच इतर सुविधा रोखता येणार नाही. त्यांनी आधार मिळवण्याचा अधिकार आहे, अशा प्रकारे कुठलीही सुविधा नाकारणे गैर असून आधारचा कायदाही याला परवानगी देत नाही, असे यूआयडीने स्पष्ट केले आहे.
  • याबाबत आलेल्या तक्रारींवर भाष्य करताना युआयडीने देशभरातील शाळांना या सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आधार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळांचीच असल्याचेही यूआयडीने स्पष्ट केले आहे.

इराणकडून तेल, रशियाकडून शस्त्रे खरेदीला भारत-अमेरिका चर्चेत महत्त्व

  • इराणी खनिज तेलाच्या आयातीवर अमेरिकेचे निर्बंध व त्याचे भारतावर परिणाम, इंडो-पॅसिफिक सहकार्य व संरक्षण तंत्रज्ञानाबाबतचे करार हे मुद्दे भारत व अमेरिका यांच्या दरम्यान गुरुवारी येथे होणाऱ्या टू प्लस टू संवादात उपस्थित केले जाणार आहेत.
  • रशियाकडून एस ४०० ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या ४० हजार कोटींच्या करारास अमेरिकेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. रशियावर निर्बंध असल्याने त्यांच्याकडून ही प्रणाली खरेदी करू नये असे अमेरिकेचे म्हणणे होते पण नंतर त्यातून भारताला सूट देण्यात आली होती. व्यापारवाढ, दहशतवादाशी मुकाबला, एच १ बी व्हिसातील अन्याय हे मुद्देही उपस्थित केले जाऊ शकतात.
  • परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी मांडावयाच्या मुद्दय़ांची चाचपणी केली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच त्यांचे अमेरिकी समपदस्थ माइक आर पॉम्पिओ व जेम्स मॅटिस यांची गुरुवारी होणारी चर्चा टू प्लस टू संवादाअंतर्गत होत आहे. हा प्रस्ताव गेल्या वर्षीच तयार करण्यात आला, पण यापूर्वी दोनदा ही चर्चा लांबणीवर पडली होती.
  • अमेरिकी प्रतिनिधी मंडळात ‘यूएस जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफ जनरल’ हे जोसेफ डनफर्ड यांचाही समावेश आहे. सुषमा स्वराज या माइक पॉम्पिओ यांच्याशी तर निर्मला सीतारामन या जेम्स मॅटिस यांच्याशी गुरुवारी द्विपक्षीय चर्चा करतील. नंतर शिष्टमंडळ पातळीवरची टू प्लस टू चर्चा घेण्यात येईल. दोन्ही बाजूचे बारा अधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. दुपारी स्वराज, सीतारामन, पॉम्पिओ हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.
  • इराण हा भारताचा तिसरा मोठा तेलपुरवठादार देश आहे. इराक व सौदी अरेबिया हे पहिले दोन पुरवठादार आहेत. इराणच्या पेट्रोलियम पदार्थावर असलेल्या आयातीवरचे निर्बंध ४ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले त्यामुळे भारतालाही फटका बसला होता. संदेशवहन, सुयोग्यता , सुरक्षा करार या मुद्दय़ांवर दोन्ही देश चर्चा करणार आहेत.

घसरत्या रुपयाचा ७२-७३ चा तळ लवकरच – तज्ज्ञांचा कयास

  • अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत असून, नजीकच्या काळात त्यापासून उसंत मिळण्याची शक्यता नसल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. मंगळवारच्या व्यवहारात आणखी ३७ पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर ७१.५८ असा विक्रमी तळ रुपयाने दाखविला. बहुतांश तज्ज्ञ रुपयाकडून ७२-७३चा तळही लवकरच दिसेल अशी शक्यता वर्तवित आहेत.
  • खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत निरंतर सुरू असलेली वाढ तसेच चीन-अमेरिका या महासत्तांमध्ये रंगलेले व्यापार युद्ध याचे चलन बाजारात विपरीत पडसाद उमटत आहेत. याचा रुपयाच्या मूल्यावर स्पष्टपणे ताण पडलेला दिसून येतो. इंधन आयात खर्चात मोठय़ा वाढीने देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून अर्थव्यवस्थेला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील, या चिंतेने रुपयाच्या मूल्यातील अस्थिरतेला खतपाणी घातले आहे.
  • या स्थितीत रुपयाने डॉलरमागे ७१ पल्याडची पातळी गाठणे फारसे आश्चर्यकारक नाही. या मागची कारणे वाढती तूट, पर्यायाने अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने, तेल भडका, विदेशी गुंतवणूकदारांचे पलायन वगैरेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहेच, त्याचेच प्रत्ययी परिणाम रुपयाच्या घसरत्या मूल्यात दिसून येत आहेत, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसच आनंद जेम्स यांनी स्पष्ट केले.

add header new

नियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC

टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel

Share This Article