देश-विदेश
नाटो शिखर परिषदेला हजर राहण्यासाठी ओबामा पोलंड, स्पेनला जाणार
# अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा या आठवडय़ात युरोपच्या दौऱ्यावर जाणार असून ते पोलंड आणि स्पेनला भेट देणार आहेत. तेथे नाटो शिखर परिषदेला हजर राहून ते युरोपमधील उच्चपदस्थ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. ब्रिटन युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अफगाणिस्तानातील स्थिती, आयसिसविरुद्धचा लढा या विषयांवरही चर्चा होणार असून ब्रेग्झिटनंतरचा युरोपीय समुदाय आणि युक्रेनवर ही चर्चा होणार आहे, असे एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. अत्यंत महत्त्वाच्या वेळी हा दौरा होत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार बेन ऱ्होड्स यांनी म्हटले आहे. वारसॉ येथे महत्त्वाच्या विविध विषयांवर चर्चा होणार असून अध्यक्षांच्या युरोप दौऱ्यात अन्य विषयांबाबतची कार्यक्रमपत्रिका ठरविण्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेतील चर्चेद्वारे ब्रेग्झिटनंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. युरोपसमवेत ज्या विषयांवर सहकार्य करण्यात येत आहे त्याबाबतही चर्चा होणार आहे. त्यामध्ये दहशतवाद, स्थलांतर, आर्थिक प्रश्न आणि रशियाचा प्रश्न यावरही चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र
चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये ‘चांदा ते बांदा’ पथदर्शी विशेष कार्यक्रम
# चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ांमध्ये सधन आधारित नियोजन व विकास योजने (रिसोर्स बेस्ड इंटेसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट) वर आधारित ‘चांदा ते बांदा’ हा पथदर्शी विशेष कार्यक्रम येत्या चार वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास राज्य शासनाच्या नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी, फलोत्पादन, संलग्न सेवा, पर्यटन, पशुविकास, दुग्घ व मत्स्य व्यवसाय, उद्योग व खनिज, तसेच संलग्न प्रक्रिया, वने, वनोत्पादन व पर्यावरण, जलसंधारण, ग्रामविकास, दारिद्रय़ निर्मूलन व कौशल्यविकास या क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्था
केरळमध्ये पिझ्झा, पास्ता, बर्गरवर नवा ‘फॅट टॅक्स’
# केरळमध्ये सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीने चालू वर्षासाठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी तेथील विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे फॅट टॅक्स. नामांकित रेस्तराँमध्ये पिझ्झा, बर्गर, पास्ता खाणाऱ्यांना यापुढे अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण राज्य सरकारने या खाद्यपदार्थांवर तब्बल १४.५ टक्के इतका फॅट टॅक्स लावण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवला आहे. त्याचबरोबर काही पॅकेज्ड पदार्थांवर पाच टक्के इतका नवा करही लावण्यात आला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक आरोग्य, कल्याणकारी योजना आणि शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्यात आले असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आले आहे. यासाठी उत्पन्नाते नवे स्रोत म्हणून फॅट टॅक्स हा नवा कर लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
‘कॅम्स’च्या मुख्य परिचालन अधिकारीपदी अनुज कुमार
# देशातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगाची भागीदार असलेल्या कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सव्र्हिसेस प्रा. लि. (कॅम्स) ने आयबीएमचे माजी ज्येष्ठ अधिकारी अनुज कुमार नवीन मुख्य परिचालन अधिकारी या पदावर तात्काळ रुजू होत असल्याची गुरुवारी घोषणा केली. कॅम्सच्या डिजिटल क्षेत्रातील स्वारस्याला ते चालना देण्यासह आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर ते कॅम्सचे देशाबाहेरील बाजारपेठेत विस्तार साधण्याची अतिरिक्त जबाबदारी वाहतील. कुमार यांची दोन दशकांहून अधिक कारकीर्द गोदरेज अप्लायन्सेस, आयसीआयसीआय समूह, दक्ष, आयबीएम आणि कॉन्सेट्रिक्समध्ये फैलावली आहे. आयबीएमच्या जीपीएस व्यवसायाचे २०११ पासून प्रभारी राहिले आहेत.