देश-विदेश
देशभरात वर्षभरात तीन हजार जनऔषधी केंद्र
# सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी या वर्षी देशभरात ३०० ‘अमृत’ची दालने तर तीन हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केली. येथे या उपक्रमांतर्गत दोन दालने सुरू करण्यात आली आहेत. त्याच्या उद्घाटनप्रसंगी नड्डा यांनी सरकारच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली.
आयर्न लेडी इरोम चानू शर्मिला यांनी उपोषण सोडले, रुग्णालयातूनही होणार सुटका
# मणिपूरच्या आयर्न लेडी म्हणून परिचित असलेल्या इरोम चानू शर्मिला यांनी गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेले उपोषण मंगळवारी सोडले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. आजपासून मी माझे उपोषण मागे घेत आहे. गेल्या १६ वर्षांतील क्षण मी कधी विसरणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. मधाचा एक चमचा चाटत त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
अर्थव्यवस्था
व्याजदर ‘जैसे थे’, राजन यांच्याकडून कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण सादर
# अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल केले नाही. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा पतधोरण आढावा आहे. पुढील महिन्यात पाच तारखेला रघुराम राजन पदावरून दूर होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पतधोरण आढाव्यामध्ये काही बदल केले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण रेपोदर, सीआरआर यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. रेपोदर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तर सीआरआरमध्येही कसलाही बदल न करता तो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.६ टक्क्यांवर राहिल, हे रिझर्व्ह बॅंकेने याआधी वर्तविलेले भाकीतही कायम ठेवण्यात आले आहे.
दर १८ टक्कय़ांपुढेच राहणार
# जीएसटी करदराची मर्यादा १८ टक्के ठेवण्याची तरतूद घटनादुरुस्ती विधेयकात करण्याची काँग्रेसची मागणी फेटाळल्यानंतर या पुढील विधेयकांमध्येही १८ टक्कय़ांच्या मर्यादेची तरतूद नसण्याचे स्पष्ट संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी चर्चेला उत्तर देताना दिले. तसेच पुढील तीन विधेयके वित्त विधेयके म्हणून आणण्याचेही सुतोवाच त्यांनी केले. प्रत्यक्षात तसे झाल्यास काँग्रेसशी पुन्हा जुंपण्याची चिन्हे आहेत.
[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]