1) मालदीवच्या अध्यक्षांनी तीन देशांत पाठवले दूत
मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी चीन, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या ‘मित्र देशांत’ आपले दूत पाठवले आहेत. अध्यक्षांच्या कार्यालयातून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन मित्र देशांत दूत पाठवण्यात आले आहेत. चीन आणि पाकिस्तानमध्ये हे दूत पोहोचलेही आहेत. तेथे ते देशातील परिस्थितीची माहिती देतील. मालदीवमध्ये भारतीय लष्कराच्या हस्तक्षेपाला आपला विरोध असेल, असे चीनने स्पष्ट केले असतानाच यामीन यांनी हे पाऊल उचलले आहे. भारताने लष्करी हस्तक्षेप करावा आणि देशाला राजकीय संकटातून बाहेर काढावे, अशी विनंती मालदीवचे निर्वासित माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी मंगळवारी केली होती. त्यानंतर भारताने आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. दुसरीकडे, मालदीवमधील विरोधी पक्षांनी चीनवर अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना चिथावत असल्याचा आणि त्यांच्या घटनाविरोधी कामांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आहे.
2) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा यांना सश्रम कारावास
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना याप्रकरणी ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली . ७२ वर्षीय खालिदा झिया यांना हा जबरदस्त राजकीय झटका असून डिसेंबरात होणाऱ्या निवडणुकीसाठी त्या उमेदवारी दाखल करणार होत्या. सध्या झिया मुख्य विरोधी पक्षनेत्या आहेत. तीन वेळा त्या पंतप्रधानपदी होत्या. ढाक्यातील विशेष न्यायालयाने याप्रकरणी निर्णय सुनावला. २१ दशलक्ष टका (२ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर्स) चा परकीय निधी त्यांनी घेतला असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. झिया अनाथाश्रमाच्या नावाने हा पैसा त्यांनी स्वीकारला होता. त्यांचे दिवंगत पती झियाउर रेहमान यांच्या नावाने ही धर्मादाय संस्था काम करते. माजी लष्करशहा एच. एम. इर्शाद यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर झिया दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्या होत्या.
3) गुगलला १३६ कोटींचा दंड
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय)ने अनुचित व्यापार व्यवहारासाठी प्रमुख इंटरनेट कंपनी गुगलला १३५.८६ कोटी रुपयांचा दंड लावला आहे. प्रतिस्पर्धा नियामकाने कंपनीला ऑनलाइन सर्व आणि जाहिरात बाजारातील मजबूत स्थितीचा दुरुपयोग करणे व बाजारातील प्रतिस्पर्धा थांबवण्याच्या गतिविधींमध्ये सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
मॅट्रिमोनी डॉट कॉम आणि कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (कट्स) च्या वतीने २०१२ गुगल एलएलसी, गुगल इंडिया प्रा. लि. आणि गुगल आयर्लंडच्या विरोधात तक्रार केली होती. सीसीआयच्या आदेशानुसार, दंडाची रक्कम १३५.८६ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०१३, १४ आणि १५ मध्ये भारतातील कंपन्यांच्या वतीने कमावलेल्या सरासरी महसूलच्या पाच टक्के आहे.
4) द. काेरियात अाजपासून िहवाळी अाॅलिम्पिक स्पर्धा
२३ व्या िहवाळी अाॅलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात हाेत अाहे. भारतीय संघ सहभागी झाला. सहाव्यांदा शिवा केशवन हा हिवाळी अाॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. याशिवाय भारताचा जगदीश अाणि नेहा अाहुजाही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा ९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काेरियातील प्याेंगचाेंग येथे रंगणार अाहे. २० वर्षांनंतर प्रथमच आशियात ही स्पर्धा होत आहे. काेरियातील या स्पर्धेत ९२ देशांतील २९५२ खेळाडू सहभागी झाले अाहेत. हे सर्व खेळाडू ७ खेळांच्या १५ प्रकारांत अापापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील. ल्यूज प्रकारात शिवा हा भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. भारताच्या ३६ वर्षी शिवाने सलग सहाव्यांदा या स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला.
5) अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब करोडपती
अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.