Current Affairs : 15 November 2020
लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार
लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते.
लोणार सरोवर नेमके वय किती, यावरून मतमतांतरे आहे. सरोवराचे वय मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण पद्धत.
यानुसार, लोणार सरोवर ५२ हजार वर्षे जुना आहे. परंतु, आजच्या काळात सर्वांत अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार, लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगितले जाते. २०१० मध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले होते.
बांगलादेशच्या सादत रहमानला ‘जागतिक शांतता पुरस्कार’ जाहीर
किशोरवयीनांची सायबर छळापासून सुटका करणारे ऍप तयार करणाऱ्या सादत रहमान या बांगलादेशी किशोरवयीन मुलाला जागतिक शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मानवी हक्क कार्यकर्त्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाया युसूफ यांनी या पुरस्काराची घोषणा केली. सायबर टिन हे ऍप बनवून त्याद्वारे मुलांचा होणारा सायबर छळ थांबवला त्यासाठी चळवळ उभारल्याबद्दल ही निवड करण्यात आली.
सायबर छळाला कंटाळून एका 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली त्यानंतर सादतने ही प्रचार मोहीम सुरू केली सायबर टिन हे ऍप गरजू किशोतवयीनांना मदत मिळवून। देणारे व्यासपीठ आहे सायबर छळ सहन करणाऱ्या सुमारे 300 गरजूंना आतापर्यंत मदत मिळवून दिली आहे तर असा छळ करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली.
45 हजार किशोरवयीन हे ऍप वापरतात. 2017 मध्ये रोहिनगे बांगलादेशात आश्रयाला आले.
‘वगीर’: पाचवी स्कॉर्पियन पाणबुडी
12 नोव्हेंबर 2020 रोजी विजया श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘वागीर’ या स्कॉर्पियन श्रेणीच्या पाचव्या पाणबुडीचे मुंबईच्या माझगाव गोदीत जलावतरण झाले.
पाणबुडी प्रोजेक्ट-75 अंतर्गत भारतीय नौदलासाठी भारतातच तयार करण्यात आली.
नौदलाच्या प्रोजेक्ट-75 अंतर्गत स्कॉर्पियन पाणबुडी प्रकल्पातल्या सहापैकी INS कलवरी आणि INS खान्देरी या दोन पाणबुड्या याआधीच नौदलात दाखल झाल्या असून उर्वरित ‘करंज’ आणि ‘वेला’ या दोन पाणबुड्यांच्या सागरी चाचण्या चाललेल्या आहेत.