⁠
Uncategorized

Daily Current Affairs 23 January 2018

1) प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचे वैभव सांगणारा चित्ररथ

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या वतीने नवी दिल्लीत राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात येणार अाहे.‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।’ या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घाेष करत छत्रपती शिवरायांची कीर्ती या चित्ररथाच्या माध्यमातून २६ जानेवारी राेजी राजपथावर विशद केली जाणार अाहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी हे काव्य संगीतबद्ध केले अाहे. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारली आहे. या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती अाहे. त्यावर मधोमध शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असेल, तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले अाहेत. राज्याभिषेक साेहळ्यात आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, साेहळ्यास उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी हेही दाखवले अाहेत. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात राजमाता जिजाऊ आसनस्थ असल्याचे दाखवले अाहे.

2) ठाणे देशातील पहिले डिजिटल शहर

देशातील पहिली डिजिटल सिटी होण्याचा मान ठाण्याला मिळणार असून ठाण्याचे नागरिक आता डिजिटल सिटिझन्स म्हणून अोळखले जाणार आहेत. इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर ठाणेकरांसाठी आता डिजिटल प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. तेल अवीव महानगरपालिका आणि फाॅक्सबेरी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये देशातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘डिजी ठाणे’ या डिजीसिटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून नागरिकांसाठीच्या सेवा, नागरिकांचा सक्रिय सहभाग, महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय, सरकारी यंत्रणा, नागरिक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वयाची एक साखळी तयार करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रत्येक नागरिकाला एक डिजीकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून सेवांचा लाभ घेण्यासाठी एक मोबाइल ॲपदेखील बनवण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिक महापालिका सेवांची देयके, महापालिकेची मूल्यवर्धित सेवा, नागरिकांना व्यावसायिक फायदे, सरकारी सुविधा आणि शहराशी संबंधित माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय शहरातील विविध माॅल्स, दुकाने या ठिकाणी सुरू असलेले सेल किंवा शहरात होणारे मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळांचे सामने याबाबतचे वेळापत्रकही या अॅपद्वारे नागरिकांच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेसंबंधीची माहिती, शहरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती, शहराच्या कोणत्या भागात वाहतुकीची कोंडी आहे, अशा सगळ्या घडामोडींचे क्षणाक्षणाचे अपडेट्स ठाणेकरांना मोबाइलवर उपलब्ध होणार आहेत.

3) भारताकडून शिकण्याचा सल्ला देणाऱ्या माजी पाकिस्तानी उच्चायुक्त हक्कानींविरुद्ध खटला

अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेले हुसैन हक्कानी यांच्याविरोधात पाकिस्तान सरकार आणि लष्कराने ‘हेट स्पीच’चा खटला दाखल केला आहे. विविध प्रकारची वक्तव्ये आणि पुस्तके प्रकाशित करून त्यांनी जगात पाकिस्तानची प्रतिमा मलीन केली असा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर हा खटला खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना पाकिस्तानला त्यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण, पठाणकोट हल्ल्यानंतर त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. हक्कानींनी यापूर्वीही पाकिस्तानवर दहशतवादविरोधी कारवायांचे ढोंग करण्याचे आरोप लावले होते.

4) सेन्सेक्सने पहिल्यांदाच पार केला 36000 चा टप्पा, निफ्टीही 11 हजारांच्या पार

मंगळवारी भारतीय शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा ऐतीहासीक कामगीरी केली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने ऐतिहासिक भरारी घेत, 36 हजाराचा टप्पा गाठला आहे. तेथेच निफ्टीही 31 अंकानी वाढून 10,997 अंकावर उघडले. बाजार उघडताच निफ्टीने पहिल्यांदाच 11,000 स्तरावर स्थिर राहिले. तर सेंसेक्स 36000 वर पोहोचले आहे.
तेजीचे कारण –
– नुकतेच सरकारने निवडक क्षेत्रामध्ये प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसच्या जीएसटी रेटमध्ये कपात केली आहे.
– अमेरिका प्रशासनामध्ये शटडाउन संपल्यानंतर सोमवारी अमेरिकी शेअर बाजारमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली.
– आशिया बाजारात तेजीची घौडदौड सुरुच आहे. सिंगापुरच्या एसजीएक्स निफ्टी इंडेक्सनेही पहिल्यादांच 11,000 च्या लेव्हल पार केली आहे.

5) प्रियंका चोप्रा ऑस्करची नामांकने जाहीर करणार

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने सलग दोन वर्षे ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवरील आगमनानंतर उपस्थितांकडून चांगलीच वाहवा मिळवली होती. या सोहळ्यात प्रियंकाचा रोल आता तेवढ्यापुरता मर्यादित राहणार नसून या वर्षी ऑस्करची नामांकने ती जाहीर करणार आहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Related Articles

Back to top button