गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. इतर राज्याच्या तुलनेत ही आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. आत्महत्याग्रस्त राज्यात मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक आहे.
गेल्या तीन वर्षात राज्यात ८ हजार, ६५१ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. महाराष्ट्राचे शेजारी प्रांत असलेल्या मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातपेक्षा महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. मध्य प्रदेशात ४ हजार ९८, कर्नाटकात २ हजार ४४८, तर गुजरातमध्ये ९५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या नकाशावर नजर टाकली असता शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा सर्वात वरचा, तर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक असल्याचे दिसून येते.२००१ ते २०१६ पर्यंतच्या या दोन राज्यांतील शेतकरी आत्महत्यांचे आकडे बघितल्यास गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रात २४ हजार ३१५ तर मध्य प्रदेशात २१ हजार ३७८ शेतक-यांनी जीवन संपविल्याचे समोर आले आहे.
शेतकरी आत्महत्येची आकडेवारी
महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक
२०१४ १९८१ ८२६ १२२
२०१५ ३२२८ १२९० १४७८
२०१६ ३०५२ ४०९८ २४४८