होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथे भरती ; पगार 39100 रुपये मिळेल

Published On: नोव्हेंबर 26, 2021
Follow Us
job

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्रशासकीय अधिकारी- (डी)
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मॅनेजमेंटमध्ये एकूण 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. 10 चा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक.

२) कनिष्ठ अभियंता- बी
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी पूर्ण वेळ सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व सॉफ्टवेअर्सची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगमधील दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

३) प्रयोगशाळा सहाय्यक- (बी)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी\ 60% च्या अधिक गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दोन वर्षांचा प्रयोगशाळा सहाय्यक पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

प्रशासकीय अधिकारी- (डी) – 45 वर्षांच्या जास्त वय नको.

कनिष्ठ अभियंता- बी – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) – 28 वर्षांच्या जास्त वय नको.

इतका मिळेल पगार :

प्रशासकीय अधिकारी- (डी) – 1,16,509/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता- बी – 35,400/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा सहाय्यक- (बी) – 39,002/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.hbcse.tifr.res.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now