UPSC Success Story प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु हे आई- वडील असतात. त्याचप्रमाणे अनुपमाचे प्रशासकीय सेवेतील देखील मार्गदर्शक व गुरू तिचे वडील आहेत. तिच्या वडिलांकडून अनुपमा अंजलीला यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील आयपीएस अधिकारी आहेत.
अनुपमा अंजली ही दिल्लीची असून तिने आपले सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. यानंतर तिने मेकॅनिकल शाखेत इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. आपण देखील अधिकारी होऊ शकतो, हा वडिलांनी विश्वास दाखवला. त्यामुळे, या महाविद्यालयीन काळात तिने प्रथम संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला आणि नंतर पुस्तकांची यादी तयार करून तयारी सुरू केली.
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पूर्ण तयारीनिशी पहिलाच प्रयत्न केला होता पण त्यात ती यशस्वी होऊ शकली नाही. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. पण तिने धीर सोडला नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि यावेळी तिने परीक्षेत ३८६ रँक मिळविला. यासह ती आयएएस अधिकारी बनली.
यूपीएससी उत्तीर्ण केलेल्या प्रत्येकाचा एक वेगळा प्रवास असतो. अनुपमाला प्रशासकीय सेवेविषयी मार्गदर्शन असले तरी अभ्यासात नियोजनबद्धता आणावी लागली. जेव्हा ते शक्य झाले तेव्हाच तिला हे यश मिळाले.