⁠  ⁠

झोपडपट्टीतील मुलांच्या मदतीसाठी ; सिमी बनली अधिकारी ! वाचा, IAS सिमीच्या यशाचा मंत्र….

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

IAS Success Story तुम्हाला युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर स्वतःवर आत्मविश्वास हवा आणि सामाजिक जाण देखील हवी.आज आम्ही तुम्हाला IAS अधिकारी सिमी करण बद्दल सांगणार आहोत ज्यांनी २०१९ च्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले आहे.

आयएएस अधिकारी सिमी करण मूळची ओडिशाची असून तिचे शालेय शिक्षण छत्तीसगडच्या भिलाई येथे झाले आहे. तिचे वडील भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करायचे, तर आई शिक्षिका होती.अभ्यासू विद्यार्थिनी असल्याने, IAS अधिकारी सिमी करणने इयत्ता बारावी नंतर अभियांत्रिकी होण्याचे ठरवले.

तिने IIT बॉम्बे येथे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला, जिथे तिला झोपडपट्टीतील स्थानिक मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादामुळे तिचे नशीब बदलले कारण तिने आपले अभियांत्रिकी करिअर सोडून यूपीएससीची तयारी करण्याचे ठरवले. आयएएस अधिकारी सिमी करण यांना विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून वाईट वाटले आणि त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना दुसऱ्या मार्गाने मदत करण्याचा विचार केला. या सगळ्याचा विचार करून तिने नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

सिमीने कधीच अभ्यासाच्या तासांवर लक्ष केंद्रित केले नाही, उलट घटकांवर लक्ष दिले. त्यामुळे, वेळापत्रकानुसार चढ-उतार झाले परंतू ती दररोज ७-८ तास अभ्यास करायची. तिने अभ्यासाच्या गुणवत्तेवर, मर्यादित पुस्तक वाचन पण जास्त सराव याकडे लक्ष दिले. याच दरम्यान तिने जॉगिंग, स्टँड-अप कॉमेडी पाहणे यासारख्या मनोरंजनासाठी देखील तिने वेळ काढला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना UPSC उमेदवारांच्या मुलाखतीचे व्हिडीओ बघितले. त्यातून काही नोट्स काढत तयारी केली.

आपण चांगला अभ्यास केला तर भविष्यात पदाचा वापर करून अनेकांना मदत करता येईल या उद्देशाने तिने IAS पद मिळवले.

Share This Article