Indian Army Agniveer Bharti 2025 : देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इंडियन आर्मीत सध्या अग्नीवीर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अग्नीवीर पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५ आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
2 अग्निवीर (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा. (Mechanic Motor Vehicle/Mechanic Diesel/Electronic Mechanic/Technician Power Electronic Systems/Electrician/ Fitter/Instrument Mechanic/ Draughtsman (All types)/ Surveyor/ Geo Informatics Assistant/Information and Communication Technology System Maintenance /Information Technology/ Mechanic Cum Operator Electric Communication System/ Vessel Navigator/ Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics Engineering/ Auto Mobile Engineering / Computer Science/Computer Engineering / Instrumentation Technology)
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science).
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता : 08वी उत्तीर्ण.
याचसोबत हवलदार, जेसीओ (रिलीजियस टीचर), जेसीओ (कॅटरिंग) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
अग्नीवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.यामध्ये एकच उमेदवार दोन पदांसाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करताना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहेत. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे लागणार आहे.
शारीरिक पात्रता :
अग्नीवीर भरतीसाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. १६०० मीटरची रेस आणि चार कॅटेगरीत निर्धारित करण्यात आली आहे. ही रेस पूर्ण करण्यासाठी आता अधिक ३० सेकंडचा वेळ मिळणार आहे. म्हणजेच ६ मिनिट १५ सेकंडमध्ये तुम्ही रेस पूर्ण केल्यावर क्वालिफाई केले जाणार आहे.
अग्नीवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०वीची मार्कशीट लावणे गरजेचे आहे. याचसोबत डोमिसाइल सर्टिफिकेटदेखील जमा करावे लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा