---Advertisement---

लग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी

By Saurabh Puranik

Published On:

hemlata-juru-parasa
---Advertisement---

लष्करात असलेल्या पतीला वीरमरण आल्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिकच्या जिद्द आणि चिकाटीची महती संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत नक्षल्यांशी लढताना पती गमावणार्‍या एका वीरपत्नीने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अत्यंत मेहनतीने तयारी करत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे. १० जानेवारीला आयोगाचे निकाल जाहीर झाले त्यात या विरपत्नीने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हेमलता जुरू परसा असे या वीर पत्नीचे नाव आहे. त्यांची ही जिद्द स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुण-तरुणींना निश्‍चितच प्रेरणादाई ठरणारी आहे.

हेमलता आणि जुरू दोघेही गोंड-माडिया आदिवासी. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरू केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताचीच. बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदवी पास झाल्यानंतर जुरू पोलिसात भरती झाला. पत्नी शिक्षिका होती. लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षल्यांशी लढताना जुरू शहीद झाला. त्यानंतर हेमलताने दुसरे लग्न न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले व स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.

पती गेल्याचे डोंगरा एवढे दु:ख असतांना अत्यंत जिद्द आणि चिकाटीने सर्व संकटांवर मात केली. २०१५ मध्ये त्या गटशिक्षणाधिकारी झाल्या. जिद्द आणि चिकाटी कायम होती. पतीच्या आठवणी आणि उंच भरारी घेण्याच्या स्वप्नाने त्यांना पुन्हा बळ दिले. शहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नुकताच १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलता यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. प्रतिकुल परिस्थितीत एका आदिवासी तरुणीने मिळवलेले हे यश इतर सर्व यशांपेक्षा खुप मोठे आहे.

आपणा सर्वांसाठी खर्‍या खुर्‍या युथ आयडॉल असणार्‍या या हेमलताताईला टीम MISSION MPSC तर्फे शुभेच्छा!

अशाच MPSC Success Stories वाचण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “लग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी”

Comments are closed.