⁠  ⁠

राज्य शासनाच्या कृषी विभागात 218 जागांसाठी भरती ; 10 ते पदवी उत्तीर्णांना संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Krushi Vibhag Recruitment 2023 कृषि विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 13 जुलै 2023 होईल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 218

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) लघुटंकलेखक / Short Typist 28
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखन गती किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

2) लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29 जागा
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

3) लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03 जागा
शैक्षणिक पात्रता : 01) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. 02) लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन गती किमान 30 शब्द प्रति मिनिट, किंवा सरकारी व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

4) वरिष्ठ लिपिक – 105 जागा
शैक्षणिक पात्रता : Minimum Second Class Graduation Degree

5) सहाय्यक अधीक्षक- 53 जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : 720/- रुपये. (मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-रुपये)
पगार (Pay Scale) :
लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2023
शुद्धिपत्र : PDF

अधिकृत संकेतस्थळ : https://www.krishi.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article