⁠  ⁠

महाराष्ट्रात ग्रामसेवकाच्या तब्बल 10 हजार पदांची बंपर भरती; पहा संपूर्ण वेळापत्रक

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Maharashtra Gramsevak Bharti 2022 : ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल १० हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. Gramsevak Bharti

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.

जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या….

पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध : १ ते ७ फेब्रुवारी २०२३
अर्ज मागवण्याची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
२३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ : या कालावधीत अर्जाची छाननी
२ ते ५ मार्च २०२३ : पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
६ ते १३ एप्रिल २०२३ : पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार
१४ ते ३० एप्रिल २०२३ : या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन
१ मे ते ३१ मे २०२३ : या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार

या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in आहे.

Share This Article