---Advertisement---

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध

By Chetan Patil

Published On:

State service pre-examination on Sunday postponed again
---Advertisement---

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 काही दिवसापूर्वीच पार पडली. आता या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील उद्या दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.

विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक १७ ऑक्टोबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००- १२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच [email protected] या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now