राज्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल ८,६६९ जागांची जंबो भरती होणार!

Published On: एप्रिल 11, 2026
Follow Us

सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ऐतिहासिक पदभरती होणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली असून, यामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

भरतीचा तपशील: अशी होणार पदे भरली
या मेगाभरतीमध्ये केवळ नियमित पदेच नव्हे, तर बाह्ययंत्रणा आणि मानधनावरील पदांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे:
नियमित पदे: एकूण ८,६६९ नियमित पदांची भरती केली जाणार आहे. विभागाचा आढावा घेऊन १६५ नवीन पदांची वाढ यात करण्यात आली आहे.
बाह्ययंत्रणा (Outsourcing): विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी २,८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरली जातील.
अंगणवाडी भरती: एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १,१०,६६४ अंगणवाडी सेविका आणि १,१०,६६४ मदतनीस अशा एकूण २,२१,३२८ मानधनाधारित पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

२३ वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षा संपली!
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, गेल्या २३ वर्षांपासून विभागातील अनेक पदे रिक्त होती किंवा त्यांच्या रचनेत बदल झालेला नव्हता. “या निर्णयामुळे महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी आता अधिक गतिमान आणि प्रभावीपणे होईल. रिक्त पदे भरल्यामुळे प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन सर्वसामान्यांना चांगल्या सेवा मिळतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तरुणांसाठी रोजगाराची पर्वणी
राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असताना, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पदभरतीला मंजुरी मिळाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now