⁠  ⁠

मिशन राज्यसेवा २०१६ – अभ्यास कसा करावा?

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

राज्यसेवा २०१६ परीक्षेला आता अवघे १३५ दिवस शिल्लक असताना अभ्यास कसा करावा असा प्रश्न आपणासमोर असेल तर त्याचे मी एकाच उत्तर देईल – Full Proof Planning ने.

आज कोणतीही गोष्ट फक्त Randomly शक्य राहिलेली नाही तुमच्या प्रत्येक कृती मागे एक Action Plan गरजेचा आहेच. हा प्लॅन आणि त्याची अंमलबजावणी तुमचे यश-अपयश ठरवणार आहे.

आपण लगेच मूळ विषयाकडे जाऊयात… आधीच सांगितल्या प्रमाणे १५५+ स्कोर हे आपण लक्ष समोर ठेवणार आहोत. त्यानुसार विचार केला असता काही संभाव्य मार्क्सचे विभाजन गणिती स्वरूपात मी आपल्या समोर मांडेल…

पेपर १ – (G.S.) – ७५+
पेपर २ – (CSAT) – ८०+

असे target ठेवून आपण अभ्यास करायला हरकत नाही. अर्थात या मध्ये आपले गणिती (Numeracy knowledge) उत्तम असेल असे मी गृहीत धरून ही Strategy देत आहे. आपण CSAT पेक्षा GS मध्ये जास्त Comfortable असाल तर हेच Structure Reshuffle (अदलाबदल) नक्कीच आपल्या सोयी नुसार केले जाऊ शकते.

Negative Marking बद्दल अनेक विद्यार्थी मला संभ्रमात दिसतात पण याचा रिस्क घेऊन फायदा कसा करावा यावर मी परीक्षेच्या आधी नक्की लिहिल.

#थोडक्यात यावरून GSसाठीचे २ निष्कर्ष सांगतो —
१. मुळात १०० पैकी ४५-५० प्रश्नांच्या Perfect अभ्यासावर आपण परीक्षा उत्तीर्ण करू शकतो.

२. ४५ प्रश्नांबद्दल जर आपण Confirm असू तर त्या उपर समतोल प्रमाणात आपण रिस्क घेण्यास सक्षम असतो.

अजूनही वेळ हातात आहे म्हणून कोणताही विषय वगळू नका. प्रत्येक विषयासाठी सारखाच वेळ (थोडा कमी अधिक प्रमाणात चालेल आवडी-पूर्वतयारी नुसार) द्या.

आता वेळेचे नियोजन करूयात –
आपल्याला १३५ दिवस आहेत हातात आणि ६ विषय + Current Affairs + CSAT.

या हिशोबाने आपल्याला पेपर १ मधील ६ विषयांसाठी १२० दिवस आहेत. प्रत्येकी २० दिवस. उरलेले २५ मार्च नंतरचे १५ दिवस हे Short Revision आणि प्रश्नपत्रिका सोडवणे यासाठी Plan करावेत.

Current Affairs चा अभ्यास हा ४ महिने – दररोज १ तास या प्रमाणे पेपर मॅगझिन यांमधून करणे हे गरजेचेच आहे.

याशिवाय दररोज २ तास CSAT चा अभ्यास आणि Practice हे देखील अत्यावश्यक आहेच.

अर्थात रोज १०-११ तास अभ्यास करणार असे Consider केले तर या ३ तासांव्यतिरिक्त ७-८ या उरलेल्या ६ विषयांच्या अभ्यासासाठी भेटतात.

एक विषय घेतला की तो २० दिवसात सलग संपवा.
प्रत्येक विषयासाठी १८ दिवस + २ दिवस revision साठी असा अवधी दिला जाऊ शकतो.

अभ्यास करताना २ तासांनंतर ब्रेक घ्या. दोन GS study सेशन मध्ये एक सेशन CSAT practice साठी द्या. (कामात बदल म्हणजेच विश्रांती असते.)

आपापल्या पद्धती प्रमाणे अभ्यास करा. लिहिण्यात कमी वेळ घालवा. (मायक्रो नोट्स)

प्रत्येक विषयाचे २० मेजर टॉपिक मध्ये विभागणी करा. दिवसमागे १ या प्रमाणे एक ठरवलेला टॉपिक घेतला तर त्याचा अभ्यास क्रमिक पुस्तके व त्यांनतर संदर्भ पुस्तके यांमधून करा.

#नियोजन –
संपूर्ण ४ महिन्यांचे नियोजन करा.. मग विषयवार विभागणी करा.. मग टॉपिकच नियोजन आणि प्रत्येक दिवसाचे व्यवस्थित नियोजन असू द्या.

Eg. आज 25 डिसेंबर या तारखेला मी राज्यशास्त्र या विषयाचा मूलभूत कायदे – कर्तव्ये – DPSP हा टॉपिक पूर्ण संपवेल.

(ही Detail Planning ची गोष्ट सगळ्यात Imp आहे. आणि ही सुरुवातीलाच बनवलेली Best असेल.)

– तेव्हा योग्य व शाक्य तेवढेच Target सेट करा आणि ते पूर्ण करा.

आधीचे सर्व यश-अपयश विसरून सकारात्मक विचाराने कामाला लागा. या दिवसांत कधीही Depress होऊ नका.

पुरेशी झोप संतुलित आहार यांकडे देखिल लक्ष असू द्या…

Meditation-Yoga-Sports Activity आपल्याला Fresh ठेवेल तेव्हा या पैकी काहीही एक activity अर्धा-एकतास नियमितपणे करा आपल्याला आपल्या अभ्यासात याचा नक्की फायदा झालेला दिसेल…

महिन्यातून १ ते दीड दिवस हा वेळ थोडे Movies किंवा एखादे Outing साठी नक्की राखून ठेवा. या गोष्टी फक्त एक Change म्हणून.

यापुढेही आम्ही आपणास वेळेवेळी मार्गदर्शन करूच… त्याच प्रमाणे विषय वार मार्गदर्शन देखील करू… परीक्षेआधी आणखी सविस्तर काही महत्वपूर्ण गोष्टी सांगेलच…

तेव्हा आमची अभ्यास strategy करून पहा नक्की फायदा होईल…

शुभेच्छा व काही प्रश्न किंव्हा काही समस्या असतील तर नक्की comments करा…
लेखाबद्दल देखील प्रतिक्रिया द्या आपल्या सूचना आम्ही नक्की विचारात घेऊ…

TAGGED:
Share This Article