⁠  ⁠

MPSC Combine : पूर्व परीक्षा २०२१ : 10 Day Fast Revision

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

MPSC Combine : पूर्व परीक्षा २०२१ : ४ सप्टेंबरच्या..
अनुषंगाने काय करावे व काय करू नये या विषयी सविस्तर
(Do’s or Don’ts: Fast Revision in Last 10 Days)

२५ ऑगस्ट :
आजच परीक्षेचे हॉल तिकीट आले आहेत. तरी Hall Ticket डाऊनलोडकरण्यासाठी सध्या अडचणी येत आहेत, त्यामुळे जास्त घाई करून वेळ घालवू नका. हाच वेळ अभ्यासावर फोकस करण्यात घालवा.

Basics चेकलिस्ट :
१. यश मिळवण्यासाठी असा कुठलाही निश्चित कालावधी / Time period नसतो. वेळ कमी , सुरुवात उशिरा झाली , आता होईल का ? हा विचार सोडून द्या .
२. येणाऱ्या १० दिवसाच्या काळात विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा स्वतःला पूर्ण पणे Quarantine करूनच अभ्यास करा म्हणजे किमान कॉन्टॅक्ट इतर दुनियेशी ठेवावे याचा फायदा अभ्यासासाठीही होईल व निगेटिव्ह व्यक्ती आपल्यापासून दूर राहतील.
३.परीक्षेच्या दिवशी जी तयारी करायचे आहे जसे हॉल तिकीट काढणे, पेन पेन्सिल अजून काही वस्तू ज्या लागणार आहेत त्या सर्व 1-2 दिवसांमध्येच आणून ठेवाव्यात.
४. आपण परीक्षेच्या ठिकाणी प्रवास करणार असाल तर प्रवास कशा पद्धतीने करणार आहोत या विषयाचे नियोजन आधीच करून घेणे.
५. येणारी परीक्षा हि सगळ्यात महत्वपूर्ण आहे असे समजून, आता इतर कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीला, विचारांना प्राधान्य किंवा लक्ष देऊ नये किंवा त्यात वेळ वाया घालवणे नुकसानकारक ठरेल.

Do’s :
१. सगळ्यात आधी पुढील १० दिवसाचे नियोजन करा. २ वेळा प्रत्येक विषय Revise होईल या प्रमाणे आपले नियोजन असावे.
२. तुमच्या दृष्टीने सोपे असणारे आणि परीक्षेच्या दृष्टीने जास्त Output मिळवून देणारे विषय आधी व Focus वर ठेवा.
३. PYQ : आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका आधी सोडवल्या असतील तरी पुन्हा सोडवा. This could be a Game-Changer thing in your overall preparation.
४. परीक्षेचे १ तासाचे योग्य नियोजन करा. कोणत्या विषयाचे प्रश्न आधी सोडवणार आणि त्या साठी किती वेळ द्यावा या विषयी Plan करा.
५. हे नियोजन फक्त Paper वर करून फायदेशीर ठरणार नाही तर यासाठी १ तास वेळ लावून किमान ३ प्रश्नपत्रिका सोडवाव्या.
६. दिवसाला किमान १० तास, तर पूर्ण अभ्यासाचे १०० तासाचे नियोजन करा आणि त्या नुसार कामाला लागा.
७. तुमच्या Strengths ओळखा आणि त्या वर सगळ्यात जास्त लक्ष द्या.

Don’ts :
१. या येणाऱ्या १० दिवसाच्या काळात नवीन पुस्तके / Study Material वाचणे टाळा.
२. इतरांच्या अभ्यासाच्या Strategy, Follow करण्यात स्वतःला Confuse करू नका.
३. पेपर बद्दल अवास्तव चिंता, अफवा यांकडे लक्ष देऊ नका.
४. येणाऱ्या काळात टेस्ट सोडवतांना कमी मार्क्स आल्यास निराश होऊ नका. यातून आपल्या Strengths & Weakness ओळखा.
५. या काळात सर्वच Distractions, पासून दूर राहा.
Eg. निगेटिव्ह लोक, सोशल मीडिया, इतर समस्या

आपले हे ४ सप्टेंबरचे PSI STI चे Target या १० दिवसात मिळवणे शक्य आहे. यावर विश्वास ठेवा.

Mission MPSC टीम कडून शुभेच्छा !

Share This Article