---Advertisement---

एमपीएससी आणि वेळेचे नियोजन

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

आजच्या लेखात एमपीएससी मुख्य परीक्षा आणि वेळेचे नियोजन याबाबत माहिती पाहू; तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेचीही माहिती घेऊ.

वेळेचे नियोजन : एमपीएससी पूर्व व मुख्य परीक्षांचा अभ्यासक्रम बघता किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी य परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे असे लक्षात येते. मग हा अभ्यासक्रम नेमका कशा प्रकारचा आहे. तो कोणत्या कोणत्या संदर्भासाहित्यातून अभ्यासायचा, नेमकी परीक्षा कशा स्वरुपाची असे, परीक्षा कशा हाताळायच्या या सर्वांसाठी किमान एक ते दीड वर्ष एवढा कालावधी निश्चितच उपयोगी आणावा लागतो. यासाठी योग्य मार्गदर्शन, स्वयंअध्ययनाची तयारी आणि परीक्षाभिमूख अभ्यासपद्धती अशी त्रिसुत्री अंमलात आणणे आवश्यक आहे.

एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवांच्या संधीकडे एक सुरक्षित आणि स्थिर करिअर म्हणून बघितले जाते. यामुळेच बहुदा शिणातील पदवी घेतल्यावर या परीक्षांच्या अभ्यासाकडे वळण्याचा निर्णय घेतात. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले असल्यामुळे पुढे आता किती काळ एमपीएससीचा अभ्यास करायचा याचे काही निश्चित धोरण आखले जात नाही. आणि मग एमपीएससीचे अटेम्प्ट हे चक्र सुरू होते. म्हणूनच एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करताना आपण स्वत:साठी वेळेची मर्यादा आखून घेणे आवश्यक आहे.

किमान किती प्रयत्न (अटेम्प्ट)? : आता एमपीएससीच्या यशाचे असे काही एकच विशेष सूत्र किंवा मार्ग नाही. यामधील निश्चितता, अनिश्चितता वेगळ्या स्वरूपाची आहे. यशाचा हमखास असा एकच फॉर्म्युला नाही. मात्र, एमपीएससीचा अभ्यासक्रम, त्याचा आवाका, परीक्षांची काठीण्यपातळी या सर्वांचा विचार करता पूर्ण वेळ अभ्यासाचे नियोजन करून किमान एमपीएससीचे तीन प्रयत्न देणे योग्य ठरते. तीनच प्रयत्न का, याचे साधारण विश्लेषण असे सांगता येईल, की पहिल्या प्रयत्नामध्ये एकूण परीक्षाचा आवाका व अभ्यासक्रम पूर्णपणे आटोपण्यास कमतरता राहू शकते. परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये पहिल्या परीक्षेचा अनुभव पाठिशी असल्यामुळे दुसरी परीक्षा फार योग्य प्रकारे देता येते. ज्या उणीवा पहिल्या अटेम्प्टमध्ये राहिल्या त्यासुद्धा भरून काढता येतात. आपण असे म्हणून शकतो की पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊ शकलो नाही कारण परीक्षेत वेळेचे नियोजन किंवा अनुभव कमी पडला. परंतु दुसऱ्या प्रयत्नात आपल्या दोन्हीमध्ये सुधारणा करून पूर्व परीक्षा पास होता येते. दुसऱ्या प्रयत्नात जर मुख्य परीक्षेत कमतरता राहिली तर ती निश्चितच तिसऱ्या प्रयत्नात पूर्ण करून आपल्याला यशापर्यंत पोहाचता येते. आपण एमपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी करणाऱ्या या तिन्ही प्रयत्नात सामान्य असणे गरजेचे आहे. हे तिन्ही प्रयत्न पूर्ण वेळेचे नियोजन करून, पूर्ण वेळ अभ्यासाला देऊन केल्यास या तीन प्रयत्नांमध्ये यश मिळवताच येऊ शकते.

आपण आधी उल्लेखल्याप्रमाणे व्यक्तीपरत्वे यामध्ये नक्कीच वेगवेगळेपणा असणार आहे. कारण प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धती, अभ्यासाचा वेग, स्वयंशिस्त या सर्व बाबींचा निश्चित परिणाम हा व्यक्तीपरत्वे वेगळा वेगळा असणार आहे.

नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर बरेच विद्यार्थी स्कोर चेक करून पुढील अभ्यासाचा निर्णय घेतात. काही जण किंवा बहुतांश विद्यार्थी २४ मार्चच्या संयुक्त पूर्व परीक्षेनंतर त्यांची अभ्यासाची पुढची दिशा निश्चित करतील. येथेच सर्व गल्लत होते. आपण जर एमपीएससीचा पूर्णवेळ अभ्यास करून असू तर पूर्व परीक्षेचा निकाल आणि त्यानंतर मुख्य परीक्षांचा अभ्यास असे अभ्यासाचे नियोजन करता येणार नाही.

मूळात एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करतानाच सुरुवात ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करणे आवश्यक असते. मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि पूर्वपरीक्षा झाली, की परत मुख्य परीक्षेचा अभ्यास हे खरे अभ्यासाचे चक्र आपल्याला यशाकडे नेऊ शकते. म्हणूनच पूर्व परीक्षा झाल्यावर स्कोअर काढण्यात ‘कटऑफ’ची चर्चा करण्यात, जागा वाढणार की नाही, जाहिरात येणार की नाही, अशा चर्चामध्ये न अडकता आपल्या नियोजनानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला तत्काळ सुरुवात करावी.

किमान पहिले तीन प्रयत्न तरी मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर पूर्व व परत मुख्य परीक्षेचा अभ्यास अशा चक्राने करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी या कालावधीत प्रत्येक परीक्षार्थींनी स्वत:ला झोकून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागणे गरजेचे आहे.

  • ( महाराष्ट्र टाईम)

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now