चालू घडामोडी : ११ ऑक्टोंबर २०२०
स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची दुसरी यादी स्विस सरकारकडून प्राप्त झाली आहे.
स्वित्झर्लंडच्या मते, भारतासह ८६ देशांना ३१ लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) ही माहिती दिली आहे.
यापूर्वी स्वित्झर्लंडनं सप्टेंबर २०१९ मध्ये भारतासह ७५ देशांना याबाबत माहिती दिली होती. एफटीएनं शुक्रवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात भारताला AOEI अंतर्गत २०१९ मध्ये स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती.
यामध्ये ७५ देशांचा समावेश होता. यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल ३१ लाख खात्यांचा समावेश असल्याचं म्हटलं होतं. परंतु स्पष्टपणे यात भारताचं नावं नव्हतं.
स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचं नाव असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
‘ऑस्कर’ अकादमीच्या समितीवर मराठमोळ्या उज्वल निरगुडकर यांची निवड
ऑस्कर अकादमीचे (Oskar) सदस्य आणि सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनीअर्सचे अध्यक्ष उज्वल निरगुडकर (Ujwal Nirgudkar) यांना हा मान मिळाला आहे.
ऑस्कर अकादमीच्या (अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅँड सायन्सेस) विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या सदस्यांमध्ये उज्वल निरगुडकर यांची निवड झाली आहे. ऑस्कर अकादमी त्याच्या संपूर्ण नावातील ‘आर्ट्स’प्रमाणे ‘विज्ञान’ विभागासाठीदेखील तितकीच कार्यक्षम असते.
कलाकार, चित्रपट यांच्या पुरस्कारांप्रमाणे त्यासंबंधी असलेलं विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीही पुरस्कार दिले जातात. त्याची निवड करण्याचं काम विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीकडे असतं.
आमच्या सर्व Updates एका Click वर Mission MPSC Telegram Channel – जॉईन करा
यंदाच्या वन्यजीव सप्ताहापासून ‘प्राणिमित्र पुरस्कार’
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात देशभरातील सर्व प्राणी संग्रहालयांमध्ये (Animal Keeper Gurunath Narvekar) ‘वन्यजीव सप्ताह’साजरा केला जातो.
या वर्षी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने ‘केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली’ यांच्यामार्फत प्राणी संग्रहालयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सन्मान पूर्वक दखल घेतली जावी, या उद्देशाने यंदाच्या वन्यजीव सप्ताहापासून ‘प्राणिमित्र पुरस्कार’ देण्यात येत आहेत.
यावेळी भायखळा येथील राणीबागेतील प्राणीपाल गुरुनाथ नार्वेकर यांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला.
यावर्षी प्राणी संग्रहालयातील विविध पदांवर कार्यरत 4 कर्मचाऱ्यांना ‘प्राणिमित्र पुरस्कार’प्रदान करण्यात आले आहे.
यामध्ये ‘प्राणीपाल’ पदावर गेली तब्बल 30 वर्षे कार्यरत असणाऱ्या गुरुनाथ नार्वेकर यांचाही समावेश आहे.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ येथे ‘प्राणीपाल’ (Animal Keeper) पदावर कार्यरत असणारे गुरुनाथ नार्वेकर यांना ‘प्राणिमित्र पुरस्कार 2020’ देऊन आज गौरविण्यात आले आहे
देशभरातील 151 प्राणी संग्रहालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून 4 कर्मचाऱ्यांची निवड यंदाच्या पुरस्कारासाठी करण्यात आली असून यामध्ये नार्वेकर यांचा समावेश आहे.