Current Affairs : 13 November 2020
भारत फिलिपिन्स देशाला विकणार घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र
‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. भारत लवकरच हे क्षेपणास्त्र निर्यात करु शकतो. पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे.
त्यावेळी दोन्ही देशांमध्ये ‘ब्रह्मोस’च्या निर्याती संदर्भात महत्त्वाचा करार होऊ शकतो. हा करार प्रत्यक्षात आल्यास फिलिपिन्स हा ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेणारा भारताचा पहिला ग्राहक ठरेल.
‘ब्रह्मोस’ हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास् आहे.
हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ३०० किलो वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौका तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टया उद्धवस्त करु शकते.या क्षेपणास्त्राचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
२०२१ चा टी-२० विश्वचषक होणार भारतात
२०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारतामध्येच होणार आहे. आयसीसीने यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
२०२१ साली ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज याव्यतिरीक्त पापुआ न्यू गिनी, नामिबीया, नेदरलँड, ओमान आणि स्कॉटलंड हे संघही या स्पर्धेत सहगभागी होणार आहेत.
२०२० साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक हा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे २०२० ऐवजी २०२२ सालच्या स्पर्धेचं यजमानपद हे ऑस्ट्रेलियाला मिळणार असल्याचं ICC ने याआधीच स्पष्ट केलं होतं.
राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी
जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
विविध क्षेत्रात एकूण ६ पुरस्कार पटकाविले आहेत.
सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९’ चे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा सलग दुसºयांदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राधिकरणाचे सदस्य तथा जनसंवाद प्रमुख अॅड. विनोद तिवारी यांनी पुरस्कार स्वीकारला. नदी पुनरूज्जीवन श्रेणी मध्ये देशातील एकूण ६ विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्हयांना पुरस्कार घोषीत करण्यात आले आहेत.
पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्हयाला अग्रणी नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हयाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसºया क्रमांकांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाह निमनीकरा सोहोमजी यांनी वाघाड प्रकल्पाच्या वतीने तर विजय देशमुख यांनी शरद पाणी वापर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.