जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर
सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे.
भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे.
सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे.
४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.
आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
देशात पहिल्यांदाच हिंगाची लागवड
भारतात पहिल्या हिंगाच्या रोपट्याची 17 ऑक्टोबरला लागवड करण्यात आली.
अफगाणिस्तानमधून आणण्यात आलेल्या हिंगाच्या बियांचे पालमपूर स्थित हिमालय जैवविविधता प्रक्रिया संस्थेमध्ये वैज्ञानिक पद्धतीने रोपटी बनविण्यात आली आहेत.
या रोपट्यांची लागवड लाहौल स्पीतीच्या जिल्ह्यात केली जात आहे.
देशात याआधी हिंगाची शेती होत नव्हती. कारण त्यासाठी थंड ठिकाण आणि अन्य नैसर्गिक गोष्टींची गरज होती. अफगाणिस्तानमधून बिया आणून प्रक्रियाकरत ही रोपटी उगवली आहेत. देशात वार्षिक खप 1200 टन आहे. अफगाणिस्तानातून 90 टक्के, उज्बेकिस्तानातून 8 आणि इराणहून 2 टक्के हिंग दरवर्षी आयात केला जातो
सलग २ शतक; धवन अायपीएलमध्ये पहिला फलंदाज
दिल्लीच्या सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (नाबाद १०६) तुफानी खेळी कायम ठेवत लीगमध्ये सलग दुसऱ्या शतकांची नाेंद केली.
त्याने मंगळवारी पंजाबविरुद्ध नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याने तीन दिवसांपूर्वी १७ अाॅक्टाेबर राेजी चेन्नईविरुद्ध १०१ धावा काढल्या हाेत्या.
सलग दाेन शतक साजरे करणारा धवन हा अायपीएलच्या इतिहासात पहिला फलंदाज ठरला.