1) निर्यातीत देशात महाराष्ट्रच अग्रेसर
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राला अन्य राज्यांकडून स्पर्धा मिळत असली तरी निर्यातीबाबत मात्र देशात अजूनही महाराष्ट्रच अग्रेसर आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ताज्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य पातळीवर माल निर्यात करण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय निर्यातीपैकी तब्बल २२.३ टक्के निर्यात महाराष्ट्राच्या हाती आहे. तसेच देशांतर्गत होणाऱ्या आंतरराज्य निर्यातीपैकी १५.७ टक्के निर्यात महाराष्ट्राच्या हाती आहे. तसेच देशातील इतर राज्यांकडून माल आयात करण्यातदेखील महाराष्ट्र राज्यच देशात आघाडीवर आहे. निर्यातीत देशात आघाडीवर असलेल्या पहिल्या ५ राज्यांमध्ये अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा यांचा समावेश असून देशाच्या एकूण आंतरराष्ट्रीय निर्यातीपैकी तब्बल ७० टक्के निर्यात या पाच राज्यांच्या हाती आहे. या निर्यातीत वस्तू आणि सेवांचाही समावेश आहे. तसेच आंतरराज्य निर्यात करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांत अनुक्रमे महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, तामिळनाडू आणि कर्नाटक यांचा समवावेश आहे. तर आयात करणाऱ्या राज्यांमध्ये अनुक्रमे महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात यांचा समावेश आहे. तसेच आंतराष्ट्रीय आयात-निर्यात व्यवसायात अधिक फायद्यात असलेल्या पहिल्या ५ राज्यांमध्ये अनुक्रमे गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, ओडिशा आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. म्हणजे या पाच राज्यांनी आयातीपेक्षा निर्यात अधिक केली आहे.
2) चंद्रग्रहणसह सुपरमून व ब्ल्यू मूनचेही दर्शन
दिनांक ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या मध्यभागी खग्रास चंद्रग्रहण पूर्ण झाले. भारतात हे ग्रहण सुटण्याच्या कालावधीत खंडग्रास अवस्थेत दिसले. सुपरमून व ब्ल्यू मूनचेही दर्शन अशा तीन खगोलीय घटना ३१ जानेवारीला एकाच दिवशी घडल्याने यास वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
#1-ब्लू मून काय असतो?
– एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या स्थितीला ब्लू मून म्हटले जाते. यंदा 2 जानेवारीला पौर्णिमा होती आणि दुसरी पौर्णिमा 31 जानेवारीला आहे.
#2- ब्लड मून म्हणजे काय?
– पृथ्वीची सावली जेव्हा संपूर्ण चंद्रमाला झाकोळून टाकते त्यानंतरही सूर्याची काही किरणे चंद्रमापर्यंत पोहोचत असतात. चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी या किरणांना पृथ्वीच्या वायूमंडलातून जावे लागते. यामुळे सूर्य किरणांची अभा पसरते पृथ्वीच्या वायूमंडलातून जेव्हा किरण चंद्रापर्यंत पोहोचतात तेव्हा चंद्र लाल रंगाचा दिसायला लागतो. या स्थितीला ब्लड मून म्हटले जाते.
#3- सूपर मून म्हणजे काय?
– चंद्राचा आकार जेव्हा सामान्य स्थितीपेक्षा अधिक मोठा दिसायला लागतो त्याला सूपर मून म्हणतात. या दरम्यान चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला आसतो.
यानंतर कधी दिसणार?
सुपर ब्लू ब्लड मून 2018 नंतर 31 जानेवारी 2028 रोजी दिसणार असून 31 जानेवारी 2037 रोजी देखील दिसणार आहे.
3) जि. प. शाळांतील मुलींना 5 रुपयांत सॅनिटरी नॅपकिन्स
ग्रामीण भागातील महिला व ११-१९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जागृती करण्यासह त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या या योजना अंमलबजावणीकरिता नोडल एजन्सी म्हणून उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) तर कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामीण महिलांना व ११-१९ वयोगटातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना वगळून इतर किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याबाबतच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेबाबत संबधित विभागाच्या समन्वयाने अस्मिता योजना राबविण्यात येणार आहे.
अशी असेल योजना
अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहायता समूहाद्वारे ग्रामीण भागात महिलांना अस्मिता या ब्रँड नावाने २४० मिमी तीन घड्यांचे आठ सॅनिटरी नॅपकिन्स २४ रुपये प्रति पॅकेट व २८० मिमी आठ सॅनिटरी नॅपकिन्स २९ रुपये प्रति पॅकेट याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ११-१९ वयोगटातील मुलींना ५ रुपये प्रति पॅकेट या सवलतीच्या दराने नॅपकिन्स मिळतील.
4) भारतीय नौदलात स्कॉर्पियन क्लास करंज पाणबुडीचा समावेश
भारतीय नौदलात बुधवारी स्कॉर्पियन क्लास करंज पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा यांची उपस्थिती होती. शत्रूच्या रडारमध्ये ही पाणबुडी दिसणार नाही. शत्रू चकवा देऊन योग्य निशाणा साधण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. यापूर्वी नौदलात कलवरी आणि खांदेरी सबमरीन लाँच करण्यात आली आली आहे. ही पाणबुडी टॉरपिडो आणि अँटी शिप मिसाईलद्वारेही हल्ला करू शकते. जमिनीवरून आणि पाण्यात सत्रूवर हल्ला करू शकते. कोणत्याही प्रकारच्या युद्धात तिचा वापर केला जाऊ शकते. ही वॉरफेयर, अँटी-सबमरीन वॉरफेयर आणि गुप्तचर यंत्रणांसाठी अत्यंत चोखपणे काम करू शकते. ही पाबुडी देशांतर्गत बनावटीची आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ती तयार करण्यात आली आहे. मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये ती तयार करण्यात आली आहे. तिची लांबी – 67.5 मीटर, ऊंची 12.3 मीटर आणि वजन 1565 टन आहे.
5) श्रीमंत देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर, अमेरिका सर्वात श्रीमंत
जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या क्रमवारीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारतातील एकूण संपत्तीचे मूल्य ८,२३० अब्ज डॉलर इतके आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने तयार केलेल्या अहवालानूसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. २०१७ साली अमेरिकेची एकूण संपत्ती ६४,५८४ अब्ज डॉलर इतकी होती. दुसरा क्रमांकावर असलेल्या चीनची एकूण संपत्ती २४,८०३ अब्ज डॉलर, तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जपानची एकूण संपत्ती १९,५२२ अब्ज डॉलर, चौथ्या क्रमांकावरील ब्रिटनची संपत्ती ९,९१९ अब्ज डॉलर, पाचव्या क्रमांकावरील जर्मनीची संपत्ती ९,६६० अब्ज डॉलर आहे. भारत सहाव्या क्रमांकावर असून, त्यांनंतर फ्रान्स (७) , कॅनडा (८), आॅस्ट्रेलिया (९) व इटली (१०) क्रमांक आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.