1) सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायमूर्तींची पत्रकार परिषद
देशाच्या इतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या ४ जजनी अभूतपूर्व पाऊल उचलले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे ज्येष्ठ जज जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे आपले म्हणणे मांडले. न्या. चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, लोकशाही संस्थेत सुधारणा झाली नाही तर लोकशाहीच संपुष्टात येईल. २० मिनिटे म्हणणे मांडल्यानंतर चौघांनी २ महिन्यांपूर्वी सरन्यायाधीशांना लिहिलेले ७ पानी पत्र जाहीर केले.
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील टॉप लिडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील टॉप लिडर्सच्या यादीत तिसऱ्या क्रमांकवर आहे. गॅलप इंटरनॅशनल सर्व्हेमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोदींनी चीनेचे प्रेसिडेंट शी जिनपिंग, रशियाचे ब्लादिमीर पुतीन, ब्रिटनेच्या पंतप्रधान थेरेसा मे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मागे टाकले आहे. गॅलपच्या या सर्व्हेमध्ये मोदींच्या पुढे दोन नावे आहेत. त्यात जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे प्रेसिडेंट इमानुएल मॅक्रां आहेत. या यादीत थेरेसा मे चौथ्या क्रमांकावर तर चीनचे प्रेसिडेंट शी जिनपिंग पाचव्या क्रमांकावर आहेत. पुतीन यांचा क्रमांक सातवा आणि सौदीचे किंग सलमान बिन अब्दुल अजीज आठव्या क्रमांकवर आहेत. सर्वात आश्यर्याची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या यादीत मोदींपासून आठ पायऱ्या खाली 11व्या क्रमांकावर आहेत.
3) आता पासपोर्ट रहिवासाचा पुरावा नाही
परराष्ट्र मंत्रालय लवकरच पासपोर्टच्या शेवटचं पानं वगळण्याची शक्यता आहे. पासपोर्टच्या शेवटच्या पानावरच धारकाचं नाव आणि पत्ता असतो. त्यामुळे येत्या काळात पासपोर्ट तुम्हाला रहिवासाचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. पासपोर्टची नवी सीरिज लवकरच येणार असून, नव्या सीरिजनुसार शेवटचे पान कोरं ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्टवर आता तुमचा पत्ता पाहायला मिळणार नाही. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ब-याचदा पासपोर्टचा रहिवासाचा पुरावा म्हणून वापर केला जातो. सद्यस्थितीत पासपोर्टच्या अंतिम पानावर संबंधित पासपोर्टधारकाचा पत्ता छापला जातो. परंतु या नव्या सीरिजमध्ये शेवटचे पान खाली ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या पानावर काहीही छापलं जाणार नाही. पासपोर्टच्या नव्या सीरिजमध्ये लवकरच बदल होणार आहे. नव्या सीरिजनुसार लवकरच तुम्हाला पासपोर्ट मिळणार आहे. पान कोरं ठेवण्याबरोबरच पासपोर्टच्या रंगामध्येही बदल केला जाणार आहे. सध्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर पासपोर्टधारकाच्या छायाचित्रासह काही आवश्यक माहिती दिली जाते. त्यानंतर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर संबंधिताचा पत्ता छापला जातो. पासपोर्टच्या शेवटच्या पानावर बारकोड देण्यात येणार असून, बारकोडला स्कॅनिंग केल्यानंतर संबंधितांची सगळी माहिती मिळणार आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.