आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावातील ऊसतोड मजूर राम लाड यांनी ऊस तोडणी करून आपल्या मुलाला शिकवलं. त्याचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एमपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून तो अनेक वर्ष एमपीएससीमध्ये तयारी करत होता.
पण आर्थिक परिस्थिती आणि हा कोरोना काळ यात अधिक अडचणी दिसून आल्या कोरोना काळामध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि त्याला अडचणींचा सामना करावा लागला.तरुणाने एमपीएससीमध्ये ४२ वी रँक मिळवत यशाचं शिखर गाठलं आहे. आई-वडिलांनी कष्ट करून शिकवलं. मुलाच्या शिक्षणासाठी आणि घर चालवण्यासाठी ऊसतोडीचं काम केलं. त्याची डीवायएसपी पदी निवड झाली.
परिस्थितीवर मात करत हार न मानता या तरुणाने मोठं यश मिळवलं. आज फक्त आई-वडीलच नाही तर गावातील लोकांनाही त्याचा अभिमान वाटतोय. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर माणूस परिस्थितीवर मात करून काहीही करून दाखवू शकतो. अतिशय गरिबीतून शिक्षण पूर्ण करून अधिकारी झाल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.