⁠  ⁠

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र

Mission MPSC
By Mission MPSC 7 Min Read
7 Min Read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र/ भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान/समज अंतराष्ट्रीय तसेच देशपातळीवर घडणार्‍या घडामोडीचे विश्‍लेषण करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच दैनंदीन जीवनाकरीता सुद्धा अर्थशास्त्राचा उपयोग होतोच. शासकीय व्यवस्थेचा भाग होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान ही एक पूर्व अटच मानली जाते व प्रशासकीय कारकीर्दीत अर्थशाखाच्या सिद्धांताचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची संधी/अथवा वेळ येतेच.

राज्यसेवा परीक्षेत अर्थशास्त्रचे महत्व

पूर्व परीक्षा – प्रश्‍न संख्या 10 ते 15
मुख्य परीक्षा – प्रश्‍न संख्या 43 ते 63
मुलाखत – मुलाखतीत अर्थशास्त्र विषयातील विविध संकल्पना तसेच चालू आर्थिक घडामोडीवर प्रश्‍न विचारली जातात. (विशेषत: वाणिज्य व व्यापार, व्यवस्थापन विषयात पदवी धारक विद्यार्थ्यांनी याबद्दल विशेष काळजी घ्यावी.)

[table id=13 /]

  • राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
    सामान्य अध्ययन
    – अर्थव्यवस्था आणि नियोजन
    – भारतीय अर्थव्यवस्था
    – ग्रामीण आणि नागरी पायाभूत सरंचना विभाग
    – उद्योग
    – सहकार
    – आर्थिक सुधारणा
    – आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल संचार
    – दारिद्र्य मोजणी आणि अंदाज
    – रोजगार निर्मिती निश्‍चित करणारे घटक
    – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

ब) विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी
– समग्रलक्षी अर्थशास्त्र
– सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
– वृद्धी, विकास आणि अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
– भारतीय कृषी, ग्रामीण विकास आणि सहकार
– कृषी
– अन्न आणि पोषण
– भारतीय उपयोग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र

* अर्थशास्त्र विषयाबद्दल पूर्वग्रह-

अर्थशास्त्र या विषयाबद्दल एक हमखास पूर्वग्रह विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची सुरुवात करताना येतो तो म्हणजे भरमसाढ आकडेवारी कशा प्रकारे लक्षात ठेवावी. अर्थशास्त्र या विषयावर काही आकडेवारी निश्‍चित महत्व आहे.

उदा. स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)
राजकोषीय तूर (fiscal Deficit)

याचा अर्थ असा नाही की संदर्भग्रथात दिलेल्या प्रत्येक आकडेवारीचा रट्टा मारणे आवश्यक आहे. GDP दार आपणास आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल कशा प्रकारे होत आहे याचे आकलन करण्यास अत्यंत महत्वाची आहे. GDP दरात वाढ अथवा घट कोणत्या कारणामुळे झाली? कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचे योगदान कशा प्रकारे होते? राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परीणाम झाला? याचे विवेचन जास्त महत्वाचे आहे.

* अर्थशास्त्र विषयावर विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे प्रकार

mpsc-economics-question-types

जर 5-10 टक्के प्रश्‍न आकडेवारीसंदर्भात (तेही अत्यंतीक महत्वाची उदा. दारिद्य्र प्रमाण) विचारली जातात. त्यामुळे आकडेवारीचा उगाच बागुल बुआ करण्याची गरज नाही.
अर्थातच 80-90 टक्के प्रश्‍न जर संकल्पना आधारित विश्‍लेषणात्मक असल्यास अभ्यासाची दिशा आपणास स्पष्टपणे त्याच प्रकारे ठेवावी लागेल. म्हणजेच अभ्यास करतांना संकल्पना समजण्यावर जास्त भर द्यावा लागेल. त्याचप्रमाणे संदर्भ ग्रंथांची निवड करतांना ज्या संदर्भग्रंथात संकल्पनांचे स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे केलेले आहे, त्यांना विशेष महत्व द्यावे लागणार.

* परीक्षेचे कान, नाक, डोळे

Syllabus / अभ्यासक्रम
आयोगाच्या मागील पाच वर्षात विचारल्या गेलेल्या पाच प्रश्‍नपत्रिका

अभ्यासक्रम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अभ्यासक्रमामुळे अभ्यासाची चौकट आपणास समजते. तसेच परीक्षेत अभ्यासक्रम आधारित प्रश्‍नांची संख्या,कल, काठिण्यपातळी सुद्धा समजते.

एकुणच हे दोन घटक अभ्यासाची दिशा ठरवल्यास मदत करतात व आपण परीक्षामुख अभ्यासच करु.

* अर्थशास्त्र संदर्भग्रंथ

Basic

11वी अर्थशास्त्र
10,11,12 NCERT Books

Reference Books

  1. भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबेसर Click Here For Buy Now
  2. भारतीय अर्थव्यवस्था – किरण देसले Click Here For Buy Now
  3. Indian Economy – Datt Ruddar & KPM Sundharam Click Here For Buy Now
  4. Video lectures of Mrunal Patel
  5. भारताचा तसेच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल
  6. India Year Book by The Unique Academy
  7. लोकसत्ता, The Hindu, Indian Express Editorial
  8. वृत्त वाहिण्याची चर्चा सत्रे
    उदा. एबीपी माझा विशेष
    आयबीएन लोकमत- बेधडक
    एनडीटीव्ही – Prime Time
  9. Unique Academy – आयोगाच्या प्रश्‍न पत्रिकाचे पुस्तक Click Here For Buy Now

* अभ्यासाचे टप्पे

1) सर्वप्रथम Basic Books यांचे किमान 3 वेळा वाचन करणे. संकल्पना समजणे.
2) संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे

संदर्भ पुस्तकाचे वाचन करतांना विविध संकल्पना व त्यांचे विविध घटक यांच्या शॉर्ट नोट्स काढता आल्या तर उत्तमच आहे. संदर्भ ग्रंथांचे वाचन व मागील प्रश्‍नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्‍नांची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे.

उदा. – राष्ट्रीय उत्पन्न या उपघटकाचा उभ्यास केल्यावर लागलीच याच घटकावर मागील 5-6 वर्षात कशाप्रकारे प्रश्‍न विचाले गेले ते सोडवावे. त्याचे विश्‍लेषण करावे. यामुळे आपणास वाचलेल्या उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. याचेतर आकलन घेणारच तसेच भविष्यात याच उपघटकावर तसेच त्यातील उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले जाऊ शकतात याचा सुद्धा अंदाज येतो.

यापुढचा टप्पा म्हणजे, याच उपघटकावर आधारीत सराव प्रश्न संचातील प्रश्‍न सुद्धा सोडवावे जेणेकरुन आपली त्या उपघटकाची उत्तम तयारी होणार व साहजिकच परीक्षेची भिती पण कमी होईल व आत्मविश्‍वास वाढेल.

प्रश्‍नांचे विश्‍लेषण

1) नियोजन आयोगाच्या अहवालानुसार ……. पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात.
1) 2100 2) 2400 3) 2800 4) 3200

योग्य उत्तर – 2) 2400

विश्‍लेषण – नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्‍चितीकरीता उष्मांक उपभोग (प्रतिदीन) हा निकष लागू केला. त्याप्रमाणे ग्रामीण भागात 2400 व शहरी भागात 2100 उष्मांक पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या व्यक्ती दारिद्र्यरेषे खाली येतात. हा निकष लावण्यात आला व हा निकष नियोजन आयोगाने स्विकारला.

भविष्यकालीन कल कशा प्रकारे ओळखावा?

आता आपण वरील प्रश्‍नाआधारे संदर्भ ग्रंथांचा वापर करुन दोन पाऊल पुढचा विचार करुया, की जेणे करुन आयोग उष्मांकासंदर्भात पुढील परिक्षेत कशाप्रकारे प्रश्‍न विचारे शकतो. वरील प्रश्‍न दारिद्र्य रेषा निश्‍चित करतांना उष्मांक निकषाबद्दल बोलत आहे. आपण याचाच आढावा घेऊ.

* उष्मांक उपभोग –
ग्रामीण भागासाठी – 2400
शहरी भागासाठी – 2100

* लाकडावाला समितीने सुद्धा उष्मांक उपभोग ग्राह्य मानला.

सुरेश तेहुलकर समितीने मात्र उष्मांक उपभोग संकल्पना अमान्य केली. त्यांच्या मते उष्मांक व पोषनाचा योग्य सहसंबंध नाही
सी रंगराजन समितीने मात्र उष्मांक उपभोग निकष ग्राह्य धरले मात्र त्यात काही बदल केले.
उदा. ग्रामीण भाग – 2155 उष्मांक
शहरी भाग – 2090 उष्मांक

वरील प्रकारच्या विश्‍लेषणाने आपण स्वत: अपेक्षीत प्रश्‍न सुद्धा तयार करु शकतो. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपण परिक्षेत अपेक्षीत प्रश्‍नांचे अंदाज बांधू शकतो आणि ते खरे सुद्धा ठरतात. यालाच परीक्षाभिमूखता म्हणता येईल व परीक्षेला हसत खेळत व आत्मविश्‍वासाने आपण सामोरे जाऊ व यश संपादन करु.

– अंकुश देशमूख, द युनिक अकॅडमी

[email protected]
9420269887

Share This Article