विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो.
अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरुप निर्मिती, भूकंप/वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. संकल्पनात्मक बाबी समजून घेतल्यावर त्यांच्याबाबतची तथ्ये लक्षात ठेवायला सोपी जातात. उपघटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
* भौगोलिक संज्ञा व संकल्पना –
* भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.
* पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार इ. बाबी सोडता येतील. भूरुपांपैकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ. या घटकांचाच अभ्यास केलास थोडा भार कमी होईल.
* जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्टय़े समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वाऱ्यांना असलेली वेगवेगळी नावे यांच्या टेबल स्वरूपात नोट्स काढता येतील.
* मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या / महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.
* कोणत्याही भौगोलिक घटना / प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत.
भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/घडते ती भौगोलिक ठिकाणे ; प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे / प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना / प्रक्रिया (current events)
* नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
* भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरुपे व संचयामुळे होणारी भूरुपे असे विभाजन करता येईल. प्रत्येक भूरुपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
* भारतातील व महाराष्ट्रातील
खडकांचे प्रकार आर्थिकदृष्टया महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.
* खडकांचा प्रकार
* निर्मिती’ कोठे आढळतो
* भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टय़े
* रचना ’ आर्थिक महत्त्व या मुद्दयांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.
* भौतिक भूगोल
* भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ. बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
* भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.
* भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.
या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.
* जागतिक भूगोलाचा फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ. चा टेबल फॉरमॉटमध्ये factual अभ्यास पुरेसा आहे.
* महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
* महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा कृषीविषयक प्रश्न वगळता बहुतांश तथ्यात्मक घटक आहे. महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटनस्थळे यांचा टेबल पद्धतीमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे. –
* स्थान ’ वैशिष्टे ’ आर्थिक महत्त्व
* असल्यास वर्गीकरण
* असल्यास संबंधित चालू घडामोडी.
* खनिजे व ऊर्जास्रोत यांचेबाबत सर्वाधिक उपलब्धतेचे जिल्हे, सर्वात जास्त उत्पादन करणारे जिल्हे, त्या त्या ठिकाणची भौगोलिक व प्राकृतिक वैशिष्टय़े यांचा टेबल पद्धतीमध्ये नोट्स काढून अभ्यास करायला हवा. या सर्व बाबींचा परस्परसंबंध व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे.
* महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी.
* महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, मृदेचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े, त्यांचे वितरण, त्या त्या जमिनीवर / मृदेमध्ये घेतली जाणारी प्रमुख पिके यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच प्रमुख पिके व त्यांचे प्रमुख उत्पादक जिल्हे यांचा आढावा आवश्यक आहे.
- फारुक नाईकवाडे