Maharashtra Agricultural Services Exam – Main Examination and Interview
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षा आणि मुलाखतीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
मुख्य परीक्षा योजना
परीक्षेचे टप्पे दोन; लेखी परीक्षा व मुलाखत
एकूण गुण : ४५०; (१) लेखी परीक्षा – ४०० गुण, (२) मुलाखत – ५० गुण
प्रश्नपत्रिका – दोन, एक अनिवार्य व एक वैकल्पिक. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे
- वैकल्पिक विषय
- परीक्षेकरिता कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या दोन विषयांमधून कोणलाही एक विषय मुख्य परीक्षेची माहिती सादर करताना निवडणे आवश्यक असते.
- आयोगाकडे माहिती सादर केल्यानंतर वैकल्पिक विषयांत कोणताही बदल करण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जात नाही.
- लेखी परीक्षेचा निकाल
- वस्तुनिष्ठ स्वरूपांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात.
- भरावयाच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध होतील, अशा रीतीने गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येते.
- गुणांची सीमारेषा सर्व उमेदवारांसाठी एकच किंवा प्रत्येक सामाजिक प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी तसेच महिला, खेळाडू इत्यादींसाठी वेगवेगळी असते.
- प्रत्येक प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी आयोगाने निश्चित केलेल्या किमान किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात येते.
- लेखी परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त होण्याकरिता शतमत (ढी१ील्ल३्र’ी)पद्धत लागू आहे. परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या तुलनेत खालीलप्रमाणे किमान शतमत गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारशींसाठी पात्र ठरतात.
१. अमागास – किमान ३५ शतमत
२. मागासवर्गीय – किमान ३० शतमत
३. विकलांग – किमान २० शतमत
४. अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू – किमान २० शतमत
- विकलांग अथवा अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू या प्रवर्गाच्या किमान सीमा रेषेच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांस दोन्हीपैकी
एकच सवलत घेता येते.
- पदांचा पसंतीक्रम
- पसंतीक्रम नमूद करण्याची फक्त एकच संधी उमेदवारास खालील अटींवर देण्यात येते-
*पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतच सादर करणे आवश्यक असते.
- पसंतीक्रम आयोगास सादर केल्यानंतर पदाच्या पसंतीक्रमात बदल करण्यासंबंधीच्या विनंतीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जात नाही.
*आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पसंतीक्रम सादर न केल्यास अधिसूचनेत नमूद केलेल्या पदक्रमांकानुसारच त्यांचा पसंतीक्रम आहे असे समजण्यात येते. त्यात नंतर बदल करण्याची संधी देण्यात येत नाही.
- मुलाखत
- मुलाखत ५० गुणांची असते.
*आयोगाने निश्चित केलेल्या किमान सीमारेषेनुसार मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या आणि जाहिरातीतील तरतुदीनुसार अर्हतेच्या विहित अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येते.
- मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता जाहिरात / अधिसूचनेतील अर्हता / अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्रांच्या आधारे तपासली जाईल आणि अर्जातील दाव्यानुसार मूळ कागदपत्र सादर करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
- विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येते तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येत नाही.
- वरीलप्रमाणे लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतात.
- उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे? त्याची मानसिक कुवत किती आहे? हे आजमावणे हा मुलाखतीचा उद्देश असतो. मुलाखतीच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये आणखीही प्रश्नांचा समावेश असतो.
इतर प्रश्नांबरोबरच ज्यांसाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी कर्तव्य व जबाबदाऱ्या कोणत्या? उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली आहे त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी कोणत्या? ग्रामीण क्षेत्राच्या स्थितीबाबत त्याला असलेली माहिती आणि ग्रामीण जनतेच्या समस्या यासंबंधी प्रश्न यांचा समावेश असतो.
- अंतिम निकाल
लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार यादी तयार करण्यात येते. सदर गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचा प्राधान्यक्रम (फंल्ल‘्रल्लॠ) उमेदवारांना सर्वसामान्य सूचनेमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार किंवा कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार ठरविण्यात येते. - फारुक नाईकवाडे
सदर लेख हा लोकसत्तामधील आहे