⁠  ⁠

पूर्व परीक्षेचे नवे स्वरूप : बदलामागची भूमिका

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read
Loading your Quiz...

प्रथमत: परीक्षा पद्धतीतील संपूर्ण बदलाचे स्वागत करून त्याचा परामर्श घेऊ या. जानेवारी २०१२ मध्ये एमपीएससीने मुख्य परीक्षेचं स्वरूप बदलवून या परीक्षा पद्धतीत मोठ्या बदलांचे संकेत यापूर्वीच दिले होते. त्याअन्वये, दि.२८ सप्टेंबर २०१२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या आराखड्यासोबत संपूर्ण परीक्षा पद्धतीची माहिती एम.पी.एस.सी.ने आपल्या www.mpsc.gov.in या संकेत स्थळावर जाहीर केली. नव्य आराखड्याअन्वये, आगामी पूर्व परीक्षा एकून ४०० गुणांची असेल त्यासाठी प्रत्येकी २०० गुणांचे दोन स्वतंत्र्य पेपर्स घेतले जातील. प्रत्येक पेपर सोडविण्यासाठी दोन तासांचा अवधी मिळणार आहे. पेपर क्र.१ मध्ये सामान्य क्षमता चाचणी (जवळपास जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच) चा समोवश आहे तर, पेपर क्र.२ मध्ये परीक्षाथींची आकलन शक्ती, निर्णयक्षमता, योग्यता तपासली जाणार आहे. पेपर-२ चा आराखडा जवळपास यु.पी.एस.सी.च्या पूर्व परीक्षेतील CSAT च्या प्रश्‍नपत्रिकेप्रमाणेच असणार आहे. या पेपरमध्ये कॉम्प्रिहेन्शन, इंटर पर्सनल स्किल्स् इन्क्ल्युडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड अ‍ॅनॅलिटिकल अ‍ॅबिलीटी, निर्णय क्षमता आणि समस्यांचे निराकरण, जनरल मेंटल अ‍ॅबिलीटी, बेसिक न्यूमरसी, डाटा इंटरप्रिटेशन याप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना असणार आहे.

#यशस्वी तज्ञांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रस्ताविक अभ्यासक्रमाचे बारकाव्याने विश्‍लेषण केल्यरस असं लक्षात येतं की, उमेदवारांचं संभाषण चातुर्य, आकलन-क्षमता, निर्णय-क्षमता, सर्वांगिण विकास, व्यक्तिमत्त्व, इ.बाबींचं परीक्षण म्हणजे, राज्यसेवा पूर्व परीक्षा! या आराखड्यात ५० टक्के अभ्यासक्रम हा दहावी/ बारावी, तर उर्वरीत ५० टक्के पदवी मानकाचा आहे. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत अधिकार म्हणून तुमचं सहकार्‍यांशी बोलणं, वागणं कसं असेल? त्याच बरोबर समोर आलेल्या ढीगभर कागदपत्रांचा सारांश/ आशय काय? यासह निष्कर्ष / अनुमान, तर्कशक्ती, अचानक उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत तुमची निर्णय-क्षमता (डिझॉस्टर मॅनेजमेंट/ वगैरे), त्याचप्रमाणे दैनंदिन आपल्या सभोवताली घडणार्‍या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही किती जागृत राहून त्यांचं विश्‍लेषण करू शकता? संबंधित पदासाठी तुम्ही सर्वांगिणपणे किती सक्षम आहात? यासह अनेक पैलूंचं परीक्षण म्हणजे राज्य-सेवा परीक्षा पद्धती होय. आगामी काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. या स्पर्धेतू यशोशिखरापर्यंतचा मार्ग कठीण वाटणारा असला तरी अशक्य मात्र अजिबात नाही. मराठी तरूणांना स्पर्धा परीक्षेत निर्माण होणार्‍या मुख्य अडचणी-योग्य मार्गदर्शनाचा अभाव, ‘स्व’ची ओळख पटवून घेण्याबद्दलची उदासीनता, शासकीय कामकाजाबाबत गैरसमज, आपल्या अचूक ध्येय गाठण्याबाबत मनात असलेली साशंकता, स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे उशिरा वळणे, वळल्यानंतर त्याबाबतची अपुरी माहिती, मनात निर्माण होणारं अपेक्षांचं ओझं, जमेल तर पाहूची वृत्ती, इ.समस्यांमुळे अभ्यासात अडचणी निर्माण होतात, या सर्व बाबी अपयशाच्या सीमारेषेजवळ नेऊन सोडतात.

#नक्की वाचा : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतांना कोणती पुस्तके वाचावीत?

मित्रहो, अडचणी कोणाला निर्माण होतात? जर, जो काहीतरी शोधेल/जाणून घेईल, म्हणजेच प्रामाणिकपणे अभ्यास करेल, त्यालाच! अडचणींवर मात करत पुढे गेल्याशिवाय यशाची गोडी चाखता येत नाही. मग या परीक्षा प्रक्रियेतील बदलाचे स्वागत करून सुयोग्य नियोजन, आत्मविश्‍वासात्मक सखोल व अचूक अभ्यास तसेच भरपूर सराव या त्रिसूत्रीचं पालन केल्यास यश नक्की तुमचेच आहे…!

संदर्भ-
Atharva-logo-78pxराज्यसेवा परीक्षा प्लॅनर
लेखक – प्रदीप देवरे
प्रकाशक – अथर्व पब्लिकेशन्स्, जळगाव
फोन नंबर – ०२५७-२२३९६६६

Share This Article