---Advertisement---

कामगाराच्या मुलाच्या अंगावर अभिमानाची वर्दी; गौरव कदमची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story : कोणत्याही गोष्टीमध्ये जर सातत्य, जिद्द व चिकाटी असेल तर यश हे नक्कीच मिळते. यात आई – वडील यांचा पाठिंबा आणि साथ महत्त्वाची असते. नांदगांव येथील दूरसंचार विभागात अल्पमजुरीवर काम करणाऱ्या सुरेश गणपत कदम यांचा मुलगा गौरव कदम. गरिबीची परिस्थिती असूनही आई – वडिलांनी मुलांना शिकवले. गौरवने देखील या सगळ्याची जाण ठेवली. आपला मुलगा एक ना एक दिवस मोठा साहेब होईल, असे त्यांना देखील वाटे. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गौरवने प्रयत्न केले. आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले.कुटुंबात पहिलाच पोलिस अधिकारी होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

गौरवचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण येथील व्ही.जे स्कूलमध्ये झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षण नांदगावच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पूर्ण केले. पदवीसाठी नाशिक येथे प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेत विज्ञान विषयाची पदवी मिळविली.त्याला अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. म्हणून त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. बाहेर काम करत त्याने अभ्यासाला सुरुवात केली.

---Advertisement---

तो दिवसाला पाच ते सहा तास अभ्यास करत असे. तर रविवारी संपूर्ण दिवस अभ्यास करत.या सगळ्या मेहनतीमुळे त्याला सर्व पायऱ्यांवर चांगले गुण मिळत गेले.‌ यामुळे त्याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. आई – वडिलांसाठी पण हे सुवर्ण दिवस म्हणता येतील. आपली कोणतीही परिस्थिती असली तरी स्वप्न गाठता येते, हे गौरवने दाखवून दिले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts