---Advertisement---

वडील सालगडी कामगार तर आई शेतकरी मजूर ; पण पोरगी झाली पोलीस उपनिरीक्षक !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC PSI Success Story घरची परिस्थितीची जाणीव ठेवत शिवालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली. याच मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले.

शिवाली उलमाले ही वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथील आहे. तिची घरची परिस्थिती बेताची असून वडील सालगडी म्हणून काम करतात. आईसुद्धा रोज मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तिने अभ्यासासाठी कोणताही महागडा क्लास लावला नाही.

तिचे संपूर्ण प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवीपासून ती राजुरा येथे मामाकडे शिकायला गेली. तिथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून मुकुटबन येथील आश्रमशाळेतून उत्तीर्ण झाली. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. शिवालीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व व मुख्य लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासादरम्यान अवांतर वाचनावर अधिक भर दिला. मुलाखतीसाठी वैभव ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. सर्व टप्पे पार करीत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. तिचा भाऊ अजित हादेखील एमपीएससीची तयारी करीत आहे. परिश्रम करण्याची तयारी, अभ्यासात सातत्य आणि अवांतर वाचन ही त्रिसूत्री असेल तर हमखास कोणीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. जसे शिवालीने आई – वडिलांचे स्वप्न पूर्ण केले तसे तुम्ही देखील करू शकता. फक्त मेहनत करायची तयारी ठेवा.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts