⁠  ⁠

राज्यसेवा २०२१ : विज्ञान

Kunal Patil
By Kunal Patil 5 Min Read
5 Min Read

MPSC Rajyaseva 2021 Science

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील GS-I मधील हा शेवटचा विषय आपण आज बघुयात. Science : विज्ञान हा विषय Maximum लोकांना कठीण वाटतो. त्यामुळे आपल्या या लेखात याला शेवटी घेतले जेणे करून तुम्हाला आधी अभ्यास कसा Start करावा हे समजावे व इतर यापेक्षा सोपे विषयांवर तुम्ही काम करावे.

राज्यसेवा २०२१ ची तयारी करतांना खालील लेख देखील नक्की वाचा

राज्यसेवा २०२१ मास्टर प्लॅन

राज्यसेवा २०२१ : राज्यशास्त्र

राज्यसेवा २०२१ : अर्थशास्त्र

राज्यसेवा २०२१ : इतिहास

 

 

आता समजून घेऊ हा विषय इतका कठीण का वाटतो. याच सर्वात मोठे कारण म्हणजे आयोगाने दिलेला अभ्यासक्रम General Science इतकाच आहे व या एका Point वर अयोग्य १८ ते २० प्रश्न विचारतो. त्यामुळे हा घटक अजून गुंतागुंतीचा होतो. यावर पर्याय म्हणून या विषयाचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजणे अधिक गरजेचे आहे.

त्यामुळे जास्त Confusion व्हायला नको म्हणून आपण Science या विषयाला प्रश्नाच्या Topic नुसार –
a) Physics
b) Chemistry
c) Biology


या Topic चा एक वेगळा विषय म्हणून विचार करू.

Book List 

बुकलिस्ट बद्दल बोलायचं तर या तीनही Topic साठी सर्वात Initial काही असेल तर ती State Board ची Books. इतर विषयांची State Board ची आपण Reference च्या  आधी आणि मग नंतर जर वाटलं तर कधी त्यांची Revision करतो. पण आपण Science या विषयी असं करू शकत नाही. Science चे state Board चे Books च आपले Reference आहे.

1) Physics :

Chemistry & Biology पेक्षा हा विषय अधिक सरळ प्रश्न येणारा आहे. फक्त २०१६ आणि २०१७ ला यात काही Examples आल्याने थोडा Complicated झाला व यापुढे प्रश्न येण्याचे शक्यता तयार झाली आहे. पण तरीही हा विषय इतर दोघांपेक्षा सोपा आहे. कारण काही मोजक्या Topics वर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा Topic चा अभ्यास करण्याची पद्धत सोपी होते पण अभ्यास नाही. आपल्याला अभ्यास करण्यासाठी तेवढेच Effortsघ्यावी लागतील.

MPSC Rajyseva Science

Physics वर Normally जास्तीत जास्त प्रश्न हे, दोन विभिन्न Concepts Merge करून येत आहेत. बऱ्याच प्रश्नात एक स्टेटमेंट Key Concept चा तर दुसरा स्टेटमेंट त्याविषयीचा Fact चा असतो. Chart मध्ये दिलेले points आणि इतर Physics. चे topic read करताना State Board मध्ये दिलेला तो topic आधी नीट Read करून मग जर वाटलेच तर बाजारातील कोणत्याही एका Reference चा आपण आधार घेऊ शकतो.

Refrence Book If Needed – सामान्य विज्ञानडॉ सचिन भस्के

2) Chemistry :

तुम्हाला घाबरवणार नाही पण मी ही या विषयाचे analysis केल्यानंतर थोडं Tension घेतलं होत. कारण यावर आलेले प्रश्न व आपल्याकडील Books मध्ये बघितले तर काही प्रश्न Match करतात तर काही अगदीच अनाकलनीय असतात. पण आपल्याला काही १०० चे १०० प्रश्न solve करायचे नसतात. त्यामुळे या घटकाचा नीट अभ्यास करा पण जास्त tension घेऊ नका. या घटकाचा एकाच Problem आहे. यात येणाऱ्या प्रश्नांपैकी ५० टक्के प्रश्न कुटून विचारलेत ते कळ्त नाही. त्यामुळे हा विषय कठीण होतो. बाकी यात काही विशेष नाही.

आत्तापर्यंत chemistry च्या आलेल्या प्रश्नांपैकी बरेच प्रश्न हे Applied knowledge वर आधारित असतात त्यामुळे आपल्याला Chemistry  च्या basic concepts ची माहिती असल्यास आणि त्याचे थोडे Applied ज्ञान असले तर हा विषय सुद्धा आपल्याला सोपा जाऊ शकतो. प्रश्न येण्याच्या बाबतीत हा विषय खूप Volatile असल्याने आपण जास्तीत-जास्त State Board च्या Book  वर आधारित अभ्यास केला पाहिजे.

3) Biology :

 आत्तापर्यंत Biology च्या Record नुसार यावर इतर दोन्ही घटकांपेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूर्व परीक्षांमध्ये Biology वर काही मोजक्या घटकांवर ६० टक्के Questions आलेले आहेत. त्यामुळे सर्वात आधी हे Topics trace करून ते पक्के करून घ्यावे. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील.

Science - Bio

या topic वर येणारे प्रश्न हे आपल्याला State Board च्या पुस्तकात अगदी सहज सापडतात. फक्त आपण त्याकडे तसे लक्ष देत नाही किंवा ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो त्या पद्धतीने ते आपण Read करत नाही हा आपला Problem आहे, आयोगाचा नाही. त्यामुळे या घटकावर इतर २ घटकांपेक्षा जास्त लक्ष द्या आणि जास्तीत जास्त मार्क्ससाठी विज्ञानातील Biology हा Scoring subject आहे.

विज्ञान हा विषय अगदीच सोपा आहे. असं आम्ही म्हणणार नाही पण या घटकात आपण सन्मानजनक Scoring करू शकतो, त्यासाठी गरज आहे Plan करून नीट अभ्यास करण्याची. हा Plan करण्यासाठीचा योग्य दृष्टीकोन आम्ही तुम्हाला दिला आहे. या लेखाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल, ही अशा करतो.

धन्यवाद.

Share This Article