MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ३८
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सहायक प्रारूपकार-नि-अवर सचिव गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : किमान तीन वर्षे कालावधीसाठी ज्युनियर ड्राफ्ट्समन’ हे पद धारण केले आहे किंवा समतुल्य
2) अवर सचिव (विधि), गट-अ 01
शैक्षणिक पात्रता : (i) विधि पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
3) वन सांख्यिकी, सामान्य राज्य सेवा गट-अ 03
शैक्षणिक पात्रता : (i) सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर+ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव.
4) संजीवन शास्त्रज्ञ, सामान्य राज्य सेवा, गट-ब 04
शैक्षणिक पात्रता : (i) द्वितीय श्रेणीसह B.Sc. किंवा M.B.B.S (ii) परफ्यूजन टेक्नॉलॉजी डिप्लोमा (iii) हृदयाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी परफ्यूजन करण्याचा किमान पन्नास वेळा अनुभव.
5) कनिष्ठ किटक शास्त्रज्ञ, सामान्य राज्य सेवा, गट-ब 04
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (प्राणीशास्त्र) (ii) 02 वर्षे अनुभव.
6) संशोधन अधिकारी/सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब 25
शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह कॉनॉमेट्रिक्स/गणितीय अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा बायोमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी/MCA किंवा समतुल्य
वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 5: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]
पद क्र.6: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: www.mpsc.gov.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification):