MPSC मधून अधिकारी होण्याचे स्वप्न लाखो तरुण बघत असतो. मात्र हे स्वप्न काहींना सत्यात उतरविता येतात. मेहनतीशिवाय फळ मिळत नाही, ही गोस्ट आपण अनेक वेळा ऐकली असेल. अधिकारी होण्यासाठी खूप अभ्यास, खूप मेहनत घ्यावी लागते. इतकं करूनही काहींना यश मिळत नाही. पण म्हणतात ना जिद्द असेल तर, परिस्थितिही गुडघे टेकते. याचीच प्रचिती देणारी एक घटना दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. Success Stori
जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील प्रशांत खर्डीवार या तरुणाने जिद्दीच्या जोरावर अपयशावर पाय ठेवून यशाचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. प्रामाणिक प्रयत्नाने गरुडझेप घेत त्याने MPSC म्हणजेच लोकसेवा आयोगाकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत मजल मारली. प्रशांत खर्डीवार या तरुणाची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
गोंडपिपरी तालुका मागास व अतिदुर्गम समजला जातो. घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे प्रशांत खर्डीवार या तरुणाने आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर चार वर्षे शेती कामे केली. कोवळ्या वयात त्याने शेतात नांगर चालविले. काही वर्षांनी त्याच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. सतरांनंबरचा फार्म भरून त्याने दहावीची परीक्षा दिली.
हे देखील वाचा : Success Story : कधी दिवसपाळी, तर कधी रात्रपाळी काम करून तरुणाने PSI पदाला घातली गवसणी
पण पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषेच्या विषयात तो नापास झाला. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी अर्ज भरला. यावेळी त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. अकरावीत नियमितपणे प्रवेश घेतला. बारावीत महाविद्यालयातून पहिला येत त्याने कमाल केली. शिक्षक होण्याच स्वप्न बघत प्रशांतने डी.एडचे शिक्षण पूर्ण केले.
दरम्यान, जि. प. शिक्षकांची पदभरती होत नव्हती. अनेक वर्षे भरतीची वाट पाहून कंटाळलेल्या प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले. गावात राहून परीक्षेची तयारी पाहिजे त्या पद्धतीने होऊ शकत नाही, हे बघून त्याने पुणे गाठले. अभ्यासाने झपाटलेल्या प्रशांतला सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे फळ मिळाले अन् तो समाजकल्याण निरीक्षक झाला.
हे पण वाचा : MPSC परीक्षेत जळगावच्या तरुणाची बाजी ; राज्यात मिळविला पहिला क्रमांक..
सध्या तो पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. या काळात लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा त्याने दिल्या. लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अलिकडेच निकाल लागला. या परीक्षेत प्रशांतने बाजी मारली. जिद्द आणि मेहनतीच्या बळावर प्रशांतने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. प्रशांतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदाच्या सहा मुलाखती दिलेल्या आहेत. तब्बल तीन वर्षांनी सहायक प्रशासकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला यात त्याने यश संपादन केलं.