---Advertisement---

जिल्हा परिषदमध्ये शिकलेल्या कविताची उपजिल्हाधिकारी पदी मजल !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story जीवनात आपण आपले ध्येय निश्चित केले तर आपण परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. मात्र यासाठी चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून बघा. आपल्या अंतर्मनाला जे वाटत तेच करा. यश हमखास आहे. हेच कविताने दाखवून दिले आहे.

कविता ही मूळची पिंपळनेर शहरापासून अवघ्या ७ किमी अंतरावरील झंझाळे येथील आहे.ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली, कविता गायकवाडाची विशेष बाब आहे.

कविताचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा झंजाळे येथे झाले. तर इयत्ता पाचवी ते आठवी कन्या विद्यालय समोडे, तर उर्वरित शिक्षण रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय नाशिक येथे झाले. २००९ मध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची ओळख कविताला कॉलेज मध्येच झाली होती. त्यानंतर नाशिकच्या मुरकुटे ग्रंथालयात २०१३ मध्ये स्वतः अभ्यास (सेल्फ स्टडी) करण्यास सुरूवात केली.

२०१४ मध्ये नोकरी सांभाळून पुन्हा पुढचा अभ्यास अखंडपणे सुरूच ठेवला. परीक्षेच्या आधी एक ते दीड महिने पूर्ण वेळ देऊन १२ ते १३ तास रोज अभ्यास असे नियोजन होते. यामुळेच,कविताला अंतिम परीक्षेत ९०० पैकी ४५७ गुण मिळवून ती एसटी संवर्गातून राज्यात प्रथम आली आहे. कविताचे अवघ्या २९व्या वर्षी हे यश मिळवले असून उपजिल्हाधिकारी झाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts