MPSC Success Story : आपल्याला मेहनत घेण्याची जिद्द असेल तर यशाच्या पायऱ्या सहज चढता येतात. या प्रवासात आई – वडिलांकडून नेहमीच प्रेरणा मिळत असते. असेच आपल्या वडिलांचा आदर्श घेत कर्जत तालुक्यातील आंबोट या गावातील पोलिस पाटील कांतीलाल मसणे यांच्या मुलाने थेट पोलीस अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे.
निलेश मसणे याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी केली आणि आज पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. त्याचे शालेय शिक्षण हे आंबोट गावातील रायगड जिल्हा परिषदेतील शाळेत झाले. चौथी नंतर बारावी पर्यंत त्याने.
गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात कला शाखेत पदवी मिळविली. २०२० मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि त्याची तयारी सुरु केली. आपले वडील गावाचे पोलिस पाटील असल्याने निलेशला पोलिस दलात येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
त्यानुसार त्याने संपूर्ण तयारी केली. फक्त अभ्यासाची तयारी केली नाहीतर शारीरिक सराव देखील केला. त्यामुळे निलेश केवळ पोलिस झाला नाहीतर थेट पोलिस अधिकारी झाला. नुकताच राज्य लोकसेवा आयोग २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात निलेशला एमपीएससी परीक्षेत यशस्वी होऊन पोलीस अधिकारी होण्याचा मान मिळविला.