---Advertisement---

दुर्गम भागातील तरुणाने मिळवलं MPSC मध्ये यश.. गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत असतात. येथे प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून असतो. त्यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी मुलेमुली या ही परिक्षा देतात. मात्र, त्यातून शेकडोच मुले त्यात प्राविण्य मिळवतात. अनेकांना तर अनेक वर्ष मेहनत करुनही या परिक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे या परिक्षेला महत्त्वाचे स्थान आहे.

अशा परिस्थितीत या परीक्षेचा क्रेझ अजूनच वाढतो. शिवाय एमपीएससीत यश संपादन केल्यानंतर सदर विद्यार्थी अधिकारी बनतो म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची त्याच्या गावापासून ते टेलिव्हिजन पर्यंत सर्वत्र चर्चा असते. दरम्यान MPSC अंतर्गत येणाऱ्या ग्रुप बी मधील STI पदावर एका दुर्गम भागातील तरुणाने घवघवीत यश मिळविलं आहे. म्हणजेच त्याने म्हणजेच विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे. यानंतर गावाने त्याचे जंगी स्वागत केले आहे.

सागर तळपे असे या तरुणाचे नाव आहे. सागर हा मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील तळपेवाडी येथील रहिवासी आहे. इतर लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे त्यानेसुद्धा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने अनेक वर्ष प्रचंड मेहनत केली आणि अखेर एसटीआय पदाला गवसणी घातली आहे.

दरम्यान, सागर तळपे या तरुणाने मिळवलेल्या या यशानंतर गावाकऱ्यांनी त्याचा जोरदार सत्कार केला. बैलगाडीवर त्याची मिरवणूक काढण्यात आली. ढोल लेझिमच्या गजरात त्याची मिरवणूक काढण्यात आली. सागर हा माजी सरपंच किसनराव तळपे यांचा मुलगा आहे. संपूर्ण परिसरात त्याच्या या यशाचे कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts