शेतकरी कन्या झाली उपजिल्हाधिकारी; सायलीची ही प्रेरणादायी यशोगाथा वाचाच..

MPSC Success Story : आपल्या गावातील लेक उच्च शिक्षण घेते आणि शासकीय अधिकारी बनू पाहते हे कित्येक गावातील गावकऱ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट असते. तशीच सायलीची देखील यशोगाथा आहे.

सायली लहानपणापासून शेतकरी कुटुंबात वाढलेली त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनाचा प्रवास तिने अनुभव होता. सायली मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरठाण गावातील आहे. तिच्या घरी आई-वडील, मोठी बहीण, लहान भाऊ आणि ती असे आमचे पाच सदस्यांचे कुटुंब आहे. सायलीचे पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण गावातील शाळेतच पूर्ण झाले.

त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण गावापासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या गोदगावच्या सरस्वती भुवन प्रशालेतून झाले. तिने महाविद्यालयीन शिक्षण हे औरंगाबादच्या सरस्वती भुवन कॉलेजमधून पूर्ण केलं. तिला CAET मध्ये चांगले गुण मिळाले असल्यामुळे कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग पुणे येथे मेकॅनिकल इंजिनीयरिंगला प्रवेश मिळाला. तिचे पदवीचे शिक्षण २०१६ साली पूर्ण झालं.

इंजिनीयरिंगचं शिक्षण घेत असताना तिचा अनेक सामाजिक (स्वयंसेवी) संस्थांबरोबर (एनजीओ) काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवाच्या आधारे तिला असं वाटलं की, आपण जर प्रशासनात गेलो तर अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला समाजासाठी कार्य करता येईल. मग मी खासगी क्षेत्रातील नोकरी न स्वीकारता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीस युपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. सन २०१७ आणि २०१८ या वर्षी फक्त युपीएससी परीक्षेवरच लक्ष केंद्रित केलं होतं. पण युपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. सन २०१९मध्ये एमपीएससीची जास्त जागांसाठी जाहिरात आली.तिने युपीएससी ऐवजी एमपीएससी परीक्षेवर केंद्रित केलं. जानेवारी २०१९ पासून एमपीएससी पूर्व परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली. पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी कमी वेळ मिळाला होता, परंतू याआधी युपीएससीचा अभ्यास केला असल्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेत फारशी अडचण आली नाही.

UPSC आणि MPSC च्या अभ्यासक्रमातील गॅप भरून काढण्यासाठी अभ्यास सुरू करण्यापूर्वी तिने आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण (Analysis) केले तिला २०१९ मधील पूर्व परीक्षेत मला २१५च्या आसपास गुण मिळाले होते. पूर्व परीक्षेचा स्कोअर चांगला असेल अशी अपेक्षा असल्यामुळे पूर्व परीक्षेनंतर लगेचच मुख्य परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली. तिने मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा देखील पार केला.

या अभ्यासाच्या काळात ती मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर राहिली. एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्यामुळे सायली उपजिल्हाधिकारी झाली. विशेष म्हणजे तिचे पती देखील Dysp या पदावर कार्यरत आहेत.