⁠  ⁠

ST महामंडळांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MSRTC Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. किंवा अर्जाची प्रत पोहोचण्याची अंतिम दिनांक ०२ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ३४

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदवीधर/ पदविका अभियांत्रिकी / Graduate Engineering ०२
शैक्षणिक पात्रता : ०
३ वर्षाचे उत्तीर्ण झालेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची अॅटोमोबाईल/ मेकॅनिकल पदवीधर इंजिनिअरिंग पास असणे आवश्यक आहे. अंटोमोबाईल मेकॅनिकल पदवीधर उपलब्ध न झाल्यास ॲटोमोबाईल मेकॅनिकल पदवीकाधारक उमेदवाराचा विचार करण्यात येईल.

२) यांत्रिकी मोटार गाडी (एम.एम.व्ही.) / Mechanical Motor Vehicle २३
शैक्षणिक पात्रता
: एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०२ वर्षाचा आय. टी. आय. मोटार मेकॅनिक व्हेईकल कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे.

३) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder ०७
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ०१ वर्षाचा आय. टी. आय. शिटमेटल वर्क कोर्स पूर्ण व पास असणे आवश्यक आहे.

४) वेल्डर (सांधाता ) / Welder ०१
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाची वेल्डर कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे

५) पेंटर (सामान्य) / Painter (General) ०१
शैक्षणिक पात्रता :
एस.एस.सी. परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसेच शा मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मधून १ वर्षाचा आय. टी. आय.पेंटर (जनरल) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक आहे

वयाची अट : ०२ जानेवारी २०२३ रोजी १५ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज नोंदणी (Apply Online) : येथे क्लिक करा

Share This Article